निळजे ते डोंबिवली रेल्वे स्थानक बससेवा पुन्हा सुरू; राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
Satara News: सातारा शहरातील ३८५ इमारती धोकादायक; ६ अतिधोकादायक इमारती पाडण्याच्या नोटिसा
गेल्या काही काळापासून ही बससेवा बंद असल्यामुळे निळजे आणि लोढा हेवन परिसरातील नागरिकांना डोंबिवली रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः कामानिमित्त, शिक्षणासाठी तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांवर किंवा रिक्षांवर अवलंबून राहावे लागत असल्याने आर्थिक भार वाढला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी ही सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती.
नागरिकांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत राजू पाटील यांनी परिवहन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. यासंदर्भात अधिकाऱ्यांना पत्र देऊन बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांशी चर्चा करून बससेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
याच माध्यमातून महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना देखील सूचित करण्यात येते की, फेरीवाले व अवैध पार्किंग यांमुळे ही बससेवा पुन्हा बंद होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस संबंधित प्रशासन जबाबदार राहील.आज सुरू झालेल्या बससेवेच्या पहिल्या फेरीप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील, विभाग अध्यक्ष रोहित भोईर, विभाग सचिव दीपक पवार, समाजसेवक निवृत्ती पाटील, विभाग सचिव पुष्पाताई भोर, वाहतूक सेनेचे अनुज दिवेकर, उपविभाग अध्यक्ष अशोक गायकर तसेच शाखाध्यक्ष राजेश काशीकर तसेच इतर पदाधिकारी, नागरिक व प्रवासी उपस्थित होते. या प्रसंगी चालक,वाहक यांचा यथोचित सन्मान करण्यात आला व नारळ वाढवून या प्रवासाला शुभेच्छा दिल्या.नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाची गैरसोय दूर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच तत्पर असून जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करत राहील.






