Photo Credit- Social media
मुंबई: राज्य सरकारने नुकतीच महत्त्वाची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असेलेला समृद्धी हायवे पुण्याला जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या आराखड्यांतर्गत पुणे ते शिरूर दरम्यान 53 किमी लांबीचा सहास्तरीय उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला असून तो अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडेल.
हा नवीन उड्डाणपूल केसनंद गावातून सुरू होऊन शिरूरपर्यंत जाणार असून त्याच्या बांधकामासाठी 7,515 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. अहमदनगरमार्गे हा उड्डाणपूल समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी अतिरिक्त 2, 050 कोटी आणिएकूण खर्च 9,565 कोटी रुपयांचा अंदाजित निधी लागणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी 250 किलोमीटर असेल.
हेही वाचा: अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात मोठ्या घडामोडी; महायुतीच्या नेत्यांना महत्त्वाच्या सूचना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या सुधारित मार्गांतर्गत पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा राष्ट्रीय महामार्ग जो पूर्वी ‘एनएचएआय’ बांधणार होता, तो आता ‘एमएसआयडीसी’ अंतर्गत बांधला जाणार आहे. एप्रिलमध्ये झालेल्या करारानुसार हा प्रकल्प ‘एमएसआयडीसी’कडे सुपूर्द करण्यात आला असून आता त्यावर वेगाने काम सुरू करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांच्यातील कनेक्टिव्हिटी तर सुधारेलच, शिवाय या भागाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासालाही नवी उंची मिळेल. एका PWD अधिकाऱ्याने सांगितले, “मार्च 2024 मध्ये स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारानुसार, PWD आणि महाराष्ट्र सरकार दोन वर्षांत प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना सुरू करतील. “तसे करण्यात अयशस्वी झाल्यास, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) सार्वजनिक हितासाठी संपूर्ण प्रकल्प ताब्यात घेण्याचा विचार करू शकते.”
हेही वाचा: कधीकाळी करत होते 80 रुपये मजुरी; आज दुग्ध व्यवसायातून करतायेत वार्षिक 8 कोटींचा