मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेवर (Mumbai corporation election) झेंडा फडकविण्यासाठी भाजपा तयार झाली आहे. मुंबई पालिका निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी हालचालींना वेग दिला आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षणामुळं (OBC reservation) पालिका निवडणूक लांबणीवर गेली आहे. पण पुढील दोन ते तीन महिन्यात मुंबई पालिका निवडणूक होणार आहे. त्यामुळं सर्वंच पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. तर मागील अनेक वर्षापासून मुंबई पालिकेवर शिवसेनेच्या (Shivsena) झेंडा आहे, यामुळं पालिकेत सत्ता कायम ठेवण्यासाठी शिवसेनेला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, तसेच ही निवडणूक शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाची तसेच अस्तित्वाची लढाई असणार आहे. त्यामुळं पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Udhavv Tahckeray) कंबर कसली असून, आज शिवसेना भवनमध्ये माजी नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली आहे. (Meeting of former corporators in Shiv Sena Bhavan)
[read_also content=”…तर तुम्ही वरिष्ठ नेतृत्वाची भेट घ्यावी, मंत्रिपदावरुन पंकजा मुंडेंना एकनाथ खडसेंचा सल्ला https://www.navarashtra.com/maharashtra/if-not-got-it-minister-post-them-you-should-be-meet-to-high-command-to-bjp-party-eknath-khadase-315179.html”]
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत शिवसेनेवरच दावा सांगितला आहे. त्यामुळे शिवसेना नक्की कोणाची, ही लढाई न्यायालयात सुरु आहे. मात्र एकीकडे आमदार, खासदार व नगरसेवकांनी शिवसेनेला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आधी पक्षाला अधिक गळती लागू नये, किंवा पक्षातील पडझड थांबविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे पक्षाच्या माजी नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या रणनीतीवर विचारमंथन करण्यात येत आहे. तसेच निवडणुकीसाठी कोणती रणनिती वापरायची, निवडणूक कशी लढवायची आदी बाबीवर चर्चा होणार आहे.