उद्धव ठाकरेंचे आमदार फुटणार? (फोटो- सोशल मीडिया)
गेल्या दीड वर्षांपासून ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरेंचे 6 खासदार आज अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. थोड्याच वेळत 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अनेक दिवस याची चर्चा सुरू होती. अखेर आज त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी वेगवान घडामोडी घडतंय दिसून येत आहेत.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत 3 आमदार गैरहजर असल्याने एकच खळबळ उडाली आहे. 6 खासदार आधीच फुटल्याने ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता आमदारांच्या बैठकीला 3 आमदार अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरे यांची बैठक शिवालय येथे सुरू असल्याचे समजते आहे. दरम्यान एकनाथ शिंदे आणि 6 खासदार येथूनच जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या मार्गांवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 6 खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैतक सुरू आहे. लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. यावेळी सर्व आमदार नगरसेवक आणि खासदार एकत्रित असणार असल्याचे समजते आहे. थोडक्यात 6 खासदारांच्या पक्ष प्रवेशावेळी एकनाथ शिंदे मोठे शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज (22 जून 2026) जाहीर झाला असून भारतीय जनता पक्षाचे (BJP) आणि महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला. मतदान केलेल्या ४५२ सदस्यांपैकी ४५१ जणांना ३३९ मते मिळवून दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि महाविकास आघाडीचे (एमव्हीए) अपक्ष उमेदवार आणि बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्ण नागेश पाटील अष्टिकर यांना केवळ ८४ मतांवर समाधान मानावे लागले.






