Bigg Boss 18: दिग्विजय राठीच्या गर्लफ्रेंडने सोशल मीडियावरून केली ब्रेकअपची घोषणा, सात महिन्यात संपलं नातं
बिग बॉस १८ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डच्या रुपाने दिग्विजय राठी आणि कशिश कपूरची एन्ट्री झाली आहे. दोघांचीही घरात एन्ट्री होऊन १५ होत आहेत तेच ‘स्प्लिट्सविला’च्या १५व्या पर्वातील दिग्विजय राठीच्या गर्लफ्रेंडने ब्रेकअपची घोषणा केली आहे. त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव इशिता रावत असं आहे.
MTV Splitsvilla 15 या हिट डेटिंग रिॲलिटी शोनंतर दिग्विजय राठी प्रसिद्धीझोता आला. ‘स्प्लिट्सविला’च्या १५व्या पर्वात दिग्विजय सिंह राठीचं उन्नती तोमरवर प्रेम जडलं होतं. या शोमध्ये दिग्विजय आणि उन्नती दोघंही एकत्र खेळायचे. पण काही दिवसांनंतर उन्नती शोच्या बाहेर आल्यामुळे दिग्विजयला कशिश कपूरला जोडीदार म्हणून निवडावं लागलं. त्यानंतर दिग्विजय आणि कशिश पॉवर कपल झाले. महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचले. पण काही कारणास्तव त्यांचं ट्रॉफीपर्यंतच स्वप्न अपूर्ण राहिलं. शोनंतर दिग्विजय आणि उन्नती हे दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट व्हायचे. त्यांच्या अनेक रिल्स इन्स्टाग्रामवरही व्हायरल व्हायच्या.
अलीकडेच दिग्विजय बिग बॉस १८च्या घरात आला आणि सर्व होत्याचं नव्हतं झालं. ‘स्प्लिट्सविला’च्या १५व्या पर्वातील स्पर्धक दिग्विजय आणि कशिश ह्या दोघांचीही बिग बॉस १८ मध्ये एन्ट्री झाली आहे. ह्यांची एन्ट्री झाल्यानंतर काही दिवसांतच दिग्विजयच्या गर्लफ्रेंडने ब्रेकअपची घोषणा केली आहे. दिग्विजय ‘बिग बॉस १८’मध्ये गेल्यापासून उन्नतीसोबतच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे दिग्विजयच्या गर्लफ्रेंडने थेट सोशल मीडियावर पोस्ट करत ब्रेकअपची घोषणा केली आहे. तिने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून चाहत्यांना ब्रेकअपची माहिती दिली आहे. उन्नतीने ब्रेकअपची घोषणा केल्यापासून दोघांचेही चाहते चिंतेत पाहायला मिळत आहे.
शेअर केलेल्या स्टोरीमध्ये उन्नतीने लिहिलंय की, “Heyyy सगळ्यांना कृपया एक विनंती आहे, दिग्विजय संबंधित कुठल्याही रिल्समध्ये किंवा पोस्टमध्ये मला मेन्शन करू नये. शिवाय, डिनतीला समर्थन करण्यात तुमचा वेळ घालवू नका. आमच्या दोघांनाही कृपया वेगवेगळं समर्थन करा. दिग्विजयच्या पीआर टीमकडून माझ्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. ही गोष्ट तुम्हीही पाहत असाल. त्यामुळे मला स्पॅम करू नका. दिग्विजय संबंधित कोणत्याही गोष्टींमध्ये मला मेन्शन करू नये. मी दिग्विजयला समर्थन देऊ इच्छिते. पण त्याच्या पीआर टीमला वाटत आहे की, मी त्याला समर्थन द्यावं. अनेकदा माझ्यासोबत हे घडलं आहे. मलाही स्वाभिमान आहे, जो मी बऱ्याच काळापासून गमावला होता.”
उन्नती तोमरच्या या इन्स्टा स्टोरीमुळे दिग्विजयबरोबर तिने ब्रेकअप केल्याचं म्हटलं जात आहे. एप्रिलमध्येच ‘स्प्लिट्सविला १५’मुळे दिग्विजय आणि उन्नती एकत्र आले होते. पण अवघ्या सात महिन्यात ‘बिग बॉस १८’मुळे दोघं दुरावले आहेत.
हे देखील वाचा- प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याने घेतली पंतप्रधानांची भेट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल