फोटो सौजन्य: Social Media
सोनी लिव्हच्या कुकिंग रिअॅलिटी शो सेलिब्रिटी मास्टरशेफचा ग्रँड फिनाले थाटात पार पडला. या फिनालेमध्ये गौरव खन्नाने आपल्या उत्कृष्ट डिशने सर्वांच्या मनावर छाप टाकत विजेतेपद पटकावलं. तो भारतातील पहिल्या सेलिब्रिटी मास्टरशेफचा मान मिळवणारा स्पर्धक ठरला आहे.
मास्टरशेफच्या या ग्रँड फिनालेमध्ये निक्की तांबोळीने दुसरा क्रमांक पटकावला, तर तेजस्वी प्रकाश तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. अंतिम फेरीत सर्व पाच स्पर्धकांनी आपले सर्वोत्तम कूकिंग स्किल्स दाखवले होते, पण गौरव खन्नाची डिश परीक्षकांना सर्वाधिक भावली. विजेतेपदासोबत गौरवला 20 लाख रुपयांचे कॅश प्राइज देखील मिळाले आहे.
राहायला 6BHK चा बंगला, फिरायला BMW कार, फराह खान पेक्षा तिच्या कूकचा थाट न्यारा; जाणून घ्या संपत्ती
या सीझनमध्ये गौरवने एक अशी खास डिश सादर केली, ज्यामुळे तो राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याच्या या डिशने परीक्षक रणवीर ब्रार, विकास खन्ना आणि फराह खान यांना मंत्रमुग्ध केलं आणि त्यांनी त्याला या सीजनमधील सर्वोत्तम पाककृतींपैकी एक म्हणून गौरवले.
गौरव खन्नाने अंतिम फेरीच्या काही दिवस आधी सादर केलेली ‘हनीकॉम्ब पावलोवा’ ही डिश खऱ्या अर्थाने सर्वांची मने जिंकणारी ठरली. वाइन ग्लासमध्ये सादर केलेल्या या खास मिठाईमध्ये मधाच्या पोळ्याच्या रचनेत पावलोवा होते, ज्यावर हे मध वाहताना दिसत होते. डिशमध्ये आल्याचा ट्विस्ट हे मुख्य आकर्षण ठरले, ज्याने चव आणि सादरीकरण या दोन्ही आघाड्यांवर परीक्षकांना थक्क केलं.
या डिशचा प्रभाव इतका जबरदस्त होता की विकास खन्ना भावूक होऊन त्याच्या हातातील चमचाच खाली पडला. रणवीर ब्रारने आनंद व्यक्त करत चमचा जोरात दाबला आणि फराह खानने गौरवला शेफचे खास चुंबन देत त्याच्या कौशल्याचं तोंडभरून कौतुक केलं. इतकी सुंदर डिश गौरवकडून अपेक्षित नव्हती, पण त्याने सर्व अपेक्षांना छेद देत स्वतःची योग्यता सिद्ध केली.
गौरवने सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये भाग घेण्यासाठी स्टार प्लसवरील लोकप्रिय अनुपमा ही मालिका सोडली होती, ज्यात तो अनुजच्या भूमिकेत प्रेक्षकांची मनं जिंकत होता. त्याच्या चाहत्यांनी त्याचा हा निर्णय सुरुवातीला फारसा पसंत केला नव्हता, पण आता त्याच्या यशामुळे हा निर्णय योग्य होता हे स्पष्ट झाले आहे. गौरव केवळ शोचा विजेता नाही, तर लाखो लोकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण करणारा कलाकार बनला आहे.