(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी मनोरंजन विश्वात लग्नघाई सुरु आहे. प्राजक्ता गायकवाज, पूजा बिरारी, भाग्यश्री न्हालवे यांच्यानंतर आता टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रसिका वाखारकर देखील लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या पहिल्या केळवणाचा सोहळा अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या घरी पार पडला.
सोहळ्यात रसिका वाखारकरच्या कुटुंबीयांसोबतच मित्रपरिवारही उपस्थित होता. विशेष म्हणजे, या पहिल्या केळवणाचा कार्यक्रम अत्यंत पारंपरिक पद्धतीने आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
हा केळवण सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला यावेळी अभिनेत्री रसिका वाखारकरने एक खास उखाणा देखील घेतला. ती म्हणाली, ” माझ्या पहिल्या केळवणासाठी जमली अख्खी टीम अशोक मा.मा., शुभंकरचं नाव घेते भारावून गेले मी…” रसिकाने घेतलेला उखाणा अशोक सराफ यांना इतका आवडला की ते आनंदाने नाचायलाच लागले. या सगळ्याला निवेदिता सराफ यांनीही तिला चांगलीच दाद दिली. पुढे रसिकाचे निवेदिता यांनी ओवाळून औक्षण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर अशोक सराफ आणि निवेदिता यांनी अभिनेत्री रसिका हिला खास साडी भेटवस्तू म्हणून दिली.
अभिनेत्री रसिका वाखारकरच्या पहिल्या केळवणाचा सोहळा उत्साहात पार पडला. या खास प्रसंगासाठी तिच्या लोकप्रिय मालिकेची ‘अशोक मा.मा.’ संपूर्ण टीम उपस्थित होती. उपस्थितांनी खास गाणी आणि डान्सने या सोहळ्याला आणखी रंगत आणली.काही दिवसांपूर्वी रसिकाने अभिनेता शुभंकर उंब्रानीसोबत साखरपुडा केला होता. आता रसिका आणि शुभंकर येत्या काही दिवसात लग्न करण्याची शक्यता आहे. रसिकाच्या लग्नाबाबत तिच्या चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता पाहायला मिळत आहे.
Bigg Boss 19 : फिनालेमध्ये धर्मेंद्रची आठवण काढल्यानंतर सलमान खानचे अश्रू अनावर, भाईजान टीव्हीवर ढसाढसा रडला
रसिका वाखारकरने तिच्या पहिल्या केळवणानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये तिने लिहिले:“मी खरंच नशीबवान आहे… माझं पहिलं केळवण या गोड व्यक्तींनी केलं. त्यांच्या प्रेमाने मी पूर्णपणे भारावून गेले आहे. हा क्षण मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार.” या पोस्टमध्ये रसिकाने अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना टॅग करून त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
अभिनेत्री रसिका वाखारकर हिने काही महिन्यांपूर्वी साखरपुड्याचे फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली होती. त्यापूर्वी रसिकाने नवऱ्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले होते, पण त्यात त्याचा चेहरा दिसत नव्हता. त्यामुळे रसिकाचा नवरा नेमका कोण, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.






