सध्या बॅालिवूड महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. Kalki 2898 AD या चित्रपटात ते अश्वत्थामाची भूमिका साकारणार आहे. त्यांचा फर्स्ट लूक समोर आल्यापासून प्रेक्षकांना त्यांना रुपेरी पडद्यावर पहायची उत्सुकता वाढली आहे. पण आता बिग बी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. ते म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या एका ट्विटनंतर महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांनी नुकतचं मुंबईच्या कोस्टल रोडचे कौतुक करणारे ट्विट केलं होतं. बिग बींचे ट्विट व्हायरल होताच त्यावर श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी उद्धव ठाकरे गटातील शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.
[read_also content=”कपिल शर्मामुृळे नेटफ्लिक्सला बसला 25 कोटींचा फटका, शो बंद करण्याची आलीये वेळ;शेवटच्या एपिसोडचे शूटिंग पूर्ण! https://www.navarashtra.com/movies/the-great-indian-kapil-show-is-going-to-off-air-soon-nrsp-529445.html”]
नेत्यांनी वक्तव्य करण्यापूर्वी या प्रकरणाला सुरुवात करणाऱ्या ट्विटमध्ये काय लिहिले आहे ते जाणून घेऊया. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या 4,999 व्या ट्विटमध्ये मुंबई कोस्टल रोडचे कौतुक केले आणि लिहिले की JVPD, जुहू ते मरीन ड्राइव्ह असा प्रवास करण्यासाठी 30 मिनिटे लागली. स्वच्छ आणि चांगला रस्ता असे त्यांनी वर्णन केले.
T 4999 – Oh ! Boy !! went to work .. after Sea Link on to Coastal Road and Tunnel underground .. JVPD, Juhu to Marine Drive , 30 mins .. !!
वाह ! क्या बात है ! साफ़ सुथरी नयी बढ़िया सड़क, कोई रुकावट नहीं ?? — Amitabh Bachchan (@SrBachchan) May 2, 2024
बिग बींच्या या ट्विटवर भाजप समर्थकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. भाजप आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून हा रस्ता तयार झाल्याचे या सर्वांचे म्हणणे आहे. त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, हा प्रकल्प शिवसेना यूबीटी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा आहे. आदित्य ठाकरे इथेच थांबले नाहीत. त्यांनी उपहासात्मकपणे सांगितले की, या प्रकल्पाशी भाजपचा संबंध एवढाच आहे की, पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेण्यासाठी दोन वर्षे लागली.
शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि भाजपचे संबंधित दावे असले तरी वास्तविक पाहता हा रस्ता मुंबई महापालिकेने बांधला आहे. २०२२ पर्यंत बीएमसी उद्धव ठाकरेंच्या पक्ष शिवसेनेच्या ताब्यात होती. या प्रकल्पाचे भूमिपूजनही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. मात्र, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.