दाक्षिणात्य स्टार थलापती विजयचे (Thalapathy Vijay) केवळ दक्षिणेत नाही तर संपूर्ण देशभरात चाहते आहेत. सगळीकडे त्याच्या चित्रपटांची लोकप्रियताआहे. या गुणी अभिनेत्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर आता राजकारण गाजवण्यास सज्ज आहे. अभिनयासोबत सामाजित जाण असलेल्या विजयने शुक्रवारी (दि.2) आपला पक्ष देखील स्थापन केलाय. ‘तमिळगा वेत्री काझम’ असं त्याच्या पक्षाचं नाव आहे. त्याच्या पक्षाची निवडणुक आयोगाकडे पक्षाची नोंदणी करण्यात आल्याची माहितीही त्याने दिली.
[read_also content=”मराठी नंतर आता दाक्षिणात्य चित्रपटासृष्टी गाजवणार सोनाली कुलकर्णी, ‘मलाइकोट्टाई वालिबान’ मधील लूक आला समोर, मोहनलालसोबत स्क्रीन शेअर करणार! https://www.navarashtra.com/movies/sonali-kulkarni-will-act-in-malayalam-movie-sharing-screen-with-actor-mohanlal-nrps-504001.html”]
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant) आणि कमल हसन (Kamal Hsan) नंतर आणखी एका अभिनेत्यानं राजकारणाची वाट धरली आहे. अनेक अभिनेते हिट सिनेमे केल्यानंतर थलापती विजय (Thalapathy Vijay) राजकारणातं एन्ट्री केली आहे. आता सगळ्याचं लक्ष थलापती विजयच्या राजकीय करिअरकडे असेल. विजयन त्याचा नवा पक्षही स्थापन केला असून याची माहिती त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे.
काही दिवसांपुर्वी थलपथी विजय लिओ चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं बॅाक्स ऑफिसवर 341 कोटीची कमाई केली होती. नुकताचं त्याच्या आगामी Greatest Of All the time या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. थलपथी विजय या नव्या चित्रपटात डबल धमाका करणार आहे. म्हणजेच यावेळी तो दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त तो थलपथी 68 या चित्रपटातुनही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.