(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवलेलं ‘कच्चा बादाम’ हे गाणं आजही अनेकांच्या आठवणीत ताजं आहे. या गाण्यामुळे एका साध्या फेरीवाल्याचं आयुष्य बदललं. ‘कच्चा बादाम’ने त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली असली तरी या गाण्याचे हक्क मात्र त्याच्याकडून काढून घेण्यात आले आहेत.
पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारे भुबन बड्याकर मूळचा बदाम विक्रेता होता. बदाम विकत असताना लोक त्याचा मोबाईल चोरून नेत, आणि त्यातूनच त्यांच्या मनात एक कल्पना आली, गाणं तयार करण्याची. “कच्चा बादाम” हे गाणं त्याने रस्त्यावरच गायले आणि एका स्थानिक व्यक्तीने त्याचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर टाकला.
प्रसिद्धी मिळण्याआधी भुबन एका साध्या झोपडीत राहायचा. तो म्हणाला, ‘आता हे माझं घर आहे,’ असं अभिमानाने आपल्या घराकडे बोट दाखवत सांगितलं. याआधी, घराच्या नावाखाली फक्त एक छोटीशी झोपडी होती. पण व्हायरल झाल्यावर सर्वात पहिली गोष्ट जी बदलली, ती म्हणजे हीच.
त्याने पुढे सांगितले,“एका व्यक्तीने मला मोठी स्वप्नं दाखवली, काही कागदांवर सही घेतली, आणि ‘कच्चा बादाम’ गाण्याचे सर्व हक्क आपल्याकडे घेतले.”जेव्हा त्याला विचारलं की त्याने या व्हायरल हिटमधून कमाई केली का, तेव्हा भुबन म्हणाला, ‘मी मुंबईला गेलो होतो. त्यांनी मला साधारण ६०,०००-७०,००० रुपये दिले. नंतर मी कोलकात्याला डीजी साहबांकडे गेलो, त्यांनी मला एक लाख रुपये आणि एक भेटवस्तू दिली. पण आता माझ्याकडे या गाण्याचा कॉपीराइट नाही.’ त्याने सांगितलं
“फराळातला एक पदार्थ तरी आईसोबत बनवायचाच!”, विजया बाबरची दिवाळीची गोड परंपरा
की कोणीतरी त्याला मोठमोठी स्वप्नं दाखवली, त्याच्याकडून कागदपत्रांवर सही घेतली आणि गाण्याचे हक्क हिसकावले. ज्या धुनने त्याचं आयुष्य बदललं, त्यानेच त्याला कायदेशीर अडचणींमध्ये अडकवलं.आज या गाण्यावर कोणत्याही प्रकारे कमाई करण्याचा हक्क भुबन याच्याकडे नाही. सोशल मीडियावर गाणं वाजत असलं, लोक नाचत असले, तरी गायकाला त्यातून मिळतंय ते केवळ नाव, कमाई नाही.
एका छोट्याशा गावात राहणाऱ्या भुबनने आपला संघर्ष विसरून, हे यश हसत-हसत स्वीकारलं आहे. तो म्हणतो, “व्हायरल झाल्याने माझं आयुष्य सुधारलं आहे. आता लोक मला ओळखतात आणि माझा आदर करतात.”
अर्जुन बिजलानी ठरला Rise and Fall चा विजेता, टीव्ही अभिनेत्याने अरुष भोलाला दिली जबरदस्त टक्कर
या गाण्यामुळे एका साध्या फेरीवाल्याचं आयुष्य बदललं. पण फक्त बाहेरून! या यशाच्या झगमगाटामागे आहे एक संघर्षमय आणि थोडा कटू प्रवास, जो गायक भुबन बड्याकर याने अनुभवला आहे.