खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला (फोटो - एक्स)
खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बारामती पोटनिवडणूक आणि अजित पवारांबाबत आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, “दादांची एनर्जी तुम्ही पाहिलेली आहे. आजही अंगावर काटा येते. सकाळी 8.30 वाजता विमान पडल्याचा तो फोन आलेला. तो दिवस आणि आजचा दिवस असं वाटतं, दादा खरच गेलाय का? कधी कधी असं वाटतं की दादा खरच गेलाय का, अशी भावना मनात येते. शेवटची ती भेट, एक फोन या गोष्टी मनात राहिल्या. विमान पडलं कसं? एका सेकंदात सगळं संपलं” अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी कडू आठवण सांगितली.
हे देखील वाचा : RSS मोहन भागवत यांच्या Z+ सुरक्षेचा खर्च कोण उचलणार? मुंबई हायकोर्टाचे सरसंघचालकांच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण विधान
पुढे त्या म्हणाल्या की, “बारामतीत बाबा सगळं इलेक्शन संपवून यायचे. प्रचाराची शेवटची सभा घ्यायचे. दादाने तीच परंपरा कायम ठेवली. दादा आणि साहेब फॉर्म भरणार आणि शेवटच्या सभेला येणार. बारामती लोकसभा मतदारसंघात आम्ही कुटुंब म्हणून काम करतो. कौटुंबिक विश्वासाची नाती आहेत. काही कमी-जास्त झालं असेल, म्हणून आमच्या मनात, नात्यात कधी अंतर आलेलं नाही. इथून पुढे कधी येऊ देणारही नाही. दादा गेल्यानंतरची सभा आहे. मला अंतकरणातून खूप दु:ख आहे. जड अंतकरणाने मी बारामतीला जात आहे. माझा भाऊ गेल्यानंतरची ही परिस्थिती आहे. दु:ख आहे,” अशा शब्दांत खासदार सुळे यांनी भावना व्यक्त केल्या.
हे देखील वाचा : वित्तीय समिती बंद करणार नाही; पुणे महापालिका आयुक्तांनी थेट नगरसेवकांनाच ठणकावले
याचबरोबर संसदेच्या नारी शक्ती वंदन विधेयकावर देखील खासदार सुळेंनी मत व्यक्त केले. त्यांनी यावर मुक्त चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान दिले. त्या म्हणाल्या की, “मुख्यमंत्री म्हणतायेत की, महिलांना 33 टक्के आरक्षण देऊ शकतो. पण पक्षात देऊ शकत नाही. माझं म्हणणं असं आहे की, भाजपला जर मनापासून महिलांना 33 टक्के आरक्षण द्यायचं असेल, तर त्यांना कोणी थांबवलेलं नाही. आम्ही रात्रभर बसायला तयार होतो, भाजप का करत नाहीय?हे बिल 2023 रोजी पास झालं. अडीचवर्ष बिल पडून होतं. अंमलबजावणी का झाली नाही? ममता बॅनर्जी यांच्या पक्षात 40 ते 50 टक्के महिला खासदार आहेत“मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलावलं तर अतिशय विनम्रपणे आमची बाजू मांडायला जाऊ. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोयीने वेळ द्यावा,” असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.






