अंबरनाथमध्ये शिवसेनेला धक्का (फोटो- टीम नवराष्ट्र)
अंबरनाथ: सेना भाजपात एकमेकांचे पदाधिकारी फोडण्याची स्पर्धा काही थांबत नसल्याचे दिसून येत आहे.महायुतीतील मित्र पक्षांनी विरोधकांचे पदाधिकारी फोडून कोंडी करण्यापेक्षा मित्र पक्षांचेच पदाधिकारी फोडाफोडीला जोमाने सुरुवात केली आहे. शिवसेनेचे मोहन पुरम परिसरातील पदाधिकारी दुर्गेश चव्हाण आणि रॉयल पार्क परिसरातील पदाधिकारी सचिन गुंजाळ यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतून (शिंदे गट) थेट भाजपात प्रवेश केला आहे. या घडामोडींमुळे शहरात भाजपा स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
मोहन पुरम परिसरात मनसेचे माजी नगरसेवक असलेले कुणाल भोईर आणि अपर्णा भोईर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले दुर्गेश चव्हाण यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत परिवारासह भाजपात प्रवेश केला. भाजपाचे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही सदिच्छा भेट घेतली.
दुसरीकडे रॉयल पार्क परिसरातून इच्छुक असलेल्या सचिन गुंजाळ यांनीही भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. रॉयल पार्क परिसरातून उमेश गुंजाळ हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. शिवसेनेतून भाजपात सुरू असलेल्या इन्कमिंगमुळे भविष्यात भाजपा अंबरनाथ पालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता वाढली आहे. तर शिंदे सेना आणि भाजप मध्ये सुरू झालेले हे पदाधिकारी खेचा-खेचीचे राजकारण पुढे कसे सुरू राहणार हे पहावे लागेल.
निवडणुकीत महायुती म्हणून लढणार? CM फडणवीसांचे विधान चर्चेत
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाहोणार आहेत. राज्यात सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. भाजप, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेना म्हणजेच महायुती आणि कॉँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजेच महाविकास आघाडी एकत्रित लढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान महायुती निवडणुका एकत्रित लढणार की नाही यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
Maharashtra Politics: निवडणुकीत महायुती म्हणून लढणार? CM फडणवीसांचे विधान चर्चेत; म्हणाले…
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महायुती लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढणार की स्वबळावर? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. भाजपने येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. विभागवार भाजप आढावा घेत आहे. आज नाशिकमदये भाजपची महत्वाची बैठक पार पडली. संघटनात्मक आढावा घेतला जात आहे. ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे महायुती म्हणून लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.






