फोटो सौजन्य- pinterest
अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ दिवस. हा दिवस वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. अक्षय या शब्दांचा अर्थ आहे कधीही न संपणारे किंवा शाश्वत. या दिवशी केलेले पुण्य, दान आणि शुभ कार्य कधीही नष्ट होत नाही असं मानलं जातं. अक्षय्य तृतीयेची महती काय आहे, जाणून घ्या
या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते. असे म्हणतात की, या दिवशी त्रेतायुगाशी सुरुवात झाली होती. परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही हा दिवस ओळखला जातो. या दिवशी सोने किंवा चांदीची खरेदी करणं शुभ मानलं जातं. नवीन व्यवसाय किंवा कामाची सुरुवात करणं, गरिबाला दानधर्म करणं, घरात पूजा, हवन आणि धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो.
महाराष्ट्रात लोक या दिवशी अन्नदान किंवा जलदान करतात. शेतकरी पेरणीपूर्वी या दिवशी भूमिपूजन देखील करतात. या दिवशी पुरणपोळी, श्रीखंड, आमरस पुरी इत्यादी विविध प्रकारचे गोड जेवण केले जाते. अक्षय्य तृतीया हा आपल्याला दान, श्रद्धा आणि सकारात्मकतेचे संदेश देतो. या दिवशी केलेले चांगले कर्म आयुष्यभर फलदायी ठरतात, अशी श्रद्धा आहे.
हिंदू धर्मात गुढीपाडवा, दसरा, दिवाळीमधील पाडवा आणि अक्षय्य तृतीया हे साडेतीन मुहूर्त मानले जातात. या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करणे जसे की घराची खरेदी, व्यवसाय, लग्नाची तयारी किंवा नवीन गुंतवणूक करणे शुभ मानले जाते, अशी श्रद्धा आहे.
या दिवशी सोने खरेदी करण्याची परंपरा खूप लोकप्रिय आहे. सोने हे संपत्ती आणि स्थैर्याचे प्रतीक असल्याने या दिवशी खरेदी केल्यास घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो, असे मानले जाते.
आजच्या विज्ञानप्रधान आणि वेगवान जीवनशैलीत साडेतीन मुहूर्तांची संकल्पना काहींना अंधश्रद्धा वाटू शकते. मात्र, या परंपरांचा मूळ हेतू समाजाला सकारात्मक ऊर्जा देणे, योग्य वेळेचे महत्त्व पटवून देणे आणि सामूहिक आनंद साजरा करणे हा आहे. अक्षय्य तृतीया आपल्याला केवळ संपत्ती मिळवण्याचा संदेश देत नाही, तर ‘सत्कर्मांची गुंतवणूक’ करण्याची शिकवण देतो. आजच्या काळात याचा अर्थ – ज्ञानदान, पर्यावरण संवर्धन, आणि सामाजिक जबाबदारी पार पाडणे असा घेणे अधिक योग्य ठरेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ दिवस असून “अक्षय” म्हणजे कधीही न संपणारे असे मानले जाते. या दिवशी केलेले पुण्यकर्म दीर्घकाळ फलदायी ठरते.
Ans: सोने हे समृद्धी आणि स्थैर्याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो, असे मानले जाते.
Ans: हा दिवस सकारात्मकता, श्रद्धा आणि चांगल्या कर्मांची सुरुवात करण्यासाठी उत्तम मानला जातो.






