फोटो सौजन्य : Pintrest
स्वप्नात नवजात बाळ पाहणे
स्वप्नात वारंवार नवजात बाळ दिसणे ही एक सामान्य गोष्ट नाही, तर हे एक अत्यंत शुभ स्वप्न मानले जाते. हे स्वप्न सूचित करते की आपले भाग्य उजळणार आहे. जर असं स्वप्नं पडलं तर भविष्यात तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार असल्याचा अंदाज बांधला जातो.
स्वप्नात बाळाला स्तनपान करणे
जर एखाद्या व्यक्तीला बाळाला स्तनपान करण्याचे स्वप्न पडले, तर असे स्वप्न अत्यंत शुभ आणि सकारात्मक मानले जाते. अशी स्वप्ने सूचित करतात की त्या व्यक्तीच्या जीवनात अनेक नवीन संधी येणार आहेत. घरात सुख, शांती वाढणार आहे.
Numerology : कोणाला करिअरमध्ये संधी तर कोणाला कौटुंबिक सुख पण…; जन्मतारखेनुसार कसा असेल मे महिना ?
स्वप्नात मुलाशी बोलणे
जर एखाद्या व्यक्तीला वारंवार लहान बाळाशी बोलण्याचे स्वप्न पडत असेल, तर अशी स्वप्ने जीवनातील शुभ आणि सकारात्मक बदलांचे संकेत देतात. स्वप्नात हसणारी मुले भविष्यात शुभ संकेत देतात.
स्वप्नात रडणारे किंवा दुःखी मूल पाहणे
हसणाऱ्या बाळाच्या संबंधित जशी शुभ स्वप्नं मानली जातात त्याचप्रमाणे स्वप्नात रडणारं बाळ हे भविष्य़ात अनेक आव्हानं दर्शवतात. स्वप्नात रडणारे किंवा दुःखी मूल पाहणे हे एक अशुभ स्वप्न मानले जाते. याचा अर्थ असा की, ती व्यक्ती एका मोठ्या जबाबदारीपासून पळ काढत आहे आणि चुकीच्या मार्गावर जात आहे. त्यामुळे असं स्नप्नं तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असं सुचित करतं.
स्वप्नात कोणत्या गोष्टी दिसणे शुभ मानले जाते, ते जाणून घेऊया
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






