Top 5 CNG Cars (फोटो- istockphoto)
देशात सीएनजी गाड्यांची मागणी वाढली
टॉप सीएनजी गाड्यांची यादी जाहीर
ऑटोमोबाइल क्षेत्रात सीएनजीची मोठी आघाडी
CNG Cars: सध्या भारतात अनेक ऑटोमोबाइल कंपन्या आहेत. ज्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन व्हेरीएन्ट आणि मॉडेल्स बाजारात लॉंच करत असतात. दरम्यान सध्या भारतीय बाजारात सीएनजी गाड्यांची मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या सीएनजी (Automobile)कारचा दबदबा पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहक आता मोठ्या प्रमाणावर सीएनजी पर्यायाकडे वळत आहेत.
ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय सीएनजी कार मार्केटवर एकाच कंपनीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असल्याचे पाहायला मिळाले आहे. एकूण विक्रीच्या जवळपास ७० टक्क्यांहून अधिक वाटा या कंपनीने उचलला आहे. ही कंपनी कोणती आहे, आणि कोणत्या टॉप 5 कार्स आहेत, त्याबाबत जाणून घेऊयात.
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी सीएनजी सेगमेंटमध्ये क्रमांक 1 ची कंपनी ठरली आहे. मारुतीकडे सध्या 13 पेक्षा जास्त सीएनजी मॉडेल्सची मोठी रेंज उपलब्ध आहे. कंपनीने एप्रिल 2026 मध्ये तब्बल 76,348 सीएनजी गाड्यांची विक्री करून नवा विक्रम केला आहे.
अप टू डेट राहणं कोणी Bajaj कडून शिकावं! खास Electric Scooter झाली अपडेट, किंमत 1 लाखांपेक्षा कमी
सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप-५ सीएनजी कार
1. मारुती सुझुकी अर्टिगा ही 7 सीटर गाडी पहिल्या नंबरवर आहे. गेल्या आर्थिक वर्षात अर्टिगाच्या 1,45,480 युनिट्सची विक्री झाली कौटुंबिक वापर आणि कमर्शिअल दोन्हीसाठीही गाडी खरेदी झाल्याचे पाहायला मिळाले.
2. मारुती सुझुकी डिझायर
दुसऱ्या क्रमांकावर मारुतीची डिझायर गाडी आहे. 5 -स्टार सेफ्टी रेटिंग आणि उत्तम मायलेजमुळे या कारच्या 1,35,330 युनिट्सची विक्री झाली आहे.
3. मारुती सुझुकी वॅगनआर
मारुती सुजुकीच्या वॅगनआरने सीएनजी सेगमेंटमध्ये तिसरे स्थान मिळवले आहे. शहरात चालवण्यासाठी सोपी आणि किफायतशीर असल्याने 96,381 6ग्राहकांनी याला पसंती दिली आहे.
4. मारुती सुझुकी ब्रेझा
एसयूव्ही सेगमेंटमध्ये सीएनजी प्रेमींची पहिली पसंती ब्रेझा ठरली आहे. 71,329 युनिट्सच्या विक्रीसह ही कार चौथ्या क्रमांकावर आहे.
टाटा नेक्सॉन
मारुतीच्या वर्चस्वाला टक्कर देत टाटा नेक्सॉनने टॉप-5 मध्ये स्थान मिळवले आहे. टाटाच्या ड्युअल सिलेंडर टेक्नॉलॉजीमुळे या कारच्या विक्रीत वाढ झाली आहे. या मॉडेलच्या 61,168 युनिट्सची विक्री झाली आहे.
सीएनजी कारची मागणी वाढण्यामागची कारणे
1. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी कारचा प्रति किलोमीटर खर्च अत्यंत कमी येतो.
2. टाटा मोटर्सने आणलेले ड्युअल सिलेंडर तंत्रज्ञान आणि मारुतीची फॅक्टरी फिटेड किट यामुळे बूट स्पेसची (डिकी) समस्या सुटली आहे.
3. प्रदुषण कमी करण्यासाठी सरकार आणि ग्राहक दोघेही सीएनजीला प्रोत्साहन देत आहेत.






