भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहामध्ये साजरी केली जात आहे (फोटो - सोशल मीडिया)
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासह समाजनिर्मितीमध्ये ज्यांनी मोलाचे योगदान दिले ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या काळामध्ये काही समाजातील माणसांचे जीवन हे प्राणीमात्रांपेक्षाही काडीमोल ठरवण्यात आले होते. अशा सर्व बांधवांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा दिला. फक्त लढा दिला नाही तर संविधान निर्मितीमध्ये त्यांनी अशा सर्व बांधवांना त्यांचे हक्क दिले. बाबासाहेब आंबेडकर शिका आणि संघटित व्हा असा संदेश दिला. शिक्षणाला आद्य महत्त्व देणार डॉ. आंबेडकर हे एक थोर समाजसुधारक, तज्ज्ञ राजकारणी, सुजाण पत्रकार होते आणि अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे निर्भड नेते होते. आज देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
1950 : भारतीय तत्त्ववेत्ते योगी रमण महर्षी तथा वेंकटरमण अय्यर समाधिस्थ झाले. (जन्म: 30 डिसेंबर 1879)
1962 : भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मृत्यु झाला. (जन्म: 15 सप्टेंबर 1860)
1963 : इतिहासकार केदारनाथ पांडे तथा राहूल सांकृतायन यांचे निधन. (जन्म: 9 एप्रिल 1893)
1997 : चित्रपट आणि नाट्य अभिनेते चंदू पारखी यांचे निधन.
2013 : उद्योगपती राम प्रसाद गोएंका यांचे निधन. (जन्म: 1 मार्च 1930)