आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांचा कारावासात संशयास्पद मृत्यू झाला होता. (फोटो - टीम नवराष्ट्र)
आदिवासी समाजातील महत्त्वपूर्ण व्यक्तीमत्त्व आणि क्रांतीकारक म्हणून बिरसा मुंडा यांची ओळख आहे. १८८६ ते १८९० या काळात चैबासा येथे वास्तव्य होते. यावेळी त्यांच्या वडिलांचे जबरदस्तीने केलेल्या धर्मांतराचा त्यांच्या मनावर दीर्घकालीन प्रभाव पडला. यानंतर त्यांनी क्रांतिकारक म्हणून ब्रिटीशांविरोधात आवाज उठवला. झारखंडमधील मुंडा जमातीचे होते आणि त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध ‘उलगुलान’ नावाचे एक मोठे आंदोलन उभारले होते. त्यांनी बिरसैत नावाचा नवा धर्म सुरु केला. बिरसा मुंडा यांच्यावर इंग्रज सरकारने विद्रोहीचे दमन करण्यासाठी 3 फेब्रुवारी 1900 अटक केली. तुरुंगामध्येच 9 जुन 1900 रोजी रहस्यमयरित्या त्यांचा मृत्यु झाला.
09 जून जन्म दिनविशेष






