बेन स्टोक्स वनडे क्रिकेट खेळणार (फोटो- ians)
बेन स्टोक्सने काही दिवसांपूर्वी इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तो कसोटी क्रिकेटचा देखील कर्णधार राहिला आहे. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू असताना बेन स्टोक्सने निवृत्ती जाहीर केली होती. इंटरनॅशनल वनडे क्रिकेटमधून धक्कादायक संन्यास घेतल्यानंतर अवघ्या तीनच आठवड्यांत बेन स्टोक्सने आपल्या या निर्णयाने क्रिकेट चाहत्यांना मोठा सुखद धक्का दिला आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार आता काउंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. काउंटी क्रिकेटमध्ये आपल्या क्लबला म्हणजेच डरहमला मदत करण्यासाठी त्याने पुन्हा एकदा ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बेन स्टोक्सने शेवटचा वनडे सामना जुलै 2023 मध्ये खेळला होता.
England मोठा डाव टाकणार; Ben Stokes निवृत्त होताच ‘या’ खेळाडूकडे देणार कर्णधारपद?
बेन स्टोक्स आता इंग्लंडच्या घरगुती क्रिकेटमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये खेळणार आहे. डरहम क्लबकडून तो खेळणार आहे. त्याच्या परत येण्यावर मुख्य प्रशिक्षक यांनी आनंद व्यक्त केला आहे. बेन स्टोक्सने सराव सुरू केला आहे. आता आम्हाला त्याच्या वर्कलोडची काळजी घ्यावी लागणार आहे. त्याला संघात खेळताना पाहण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचे डरहम क्लबच्या मुख्य प्रशिक्षकांनी सांगितले.
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू असतानाच बेन स्टोक्सने निवृत्ती जाहीर केली होती. तब्बल तीन वर्षांनी तो पुन्हा एकदा वनडे सिरिज खेळताना दिसणार आहे. त्यामुळे डरहम क्लबचे खेळाडू आणि चाहते देखील आनंदी झाले आहेत.
NZ Vs ENG: इंग्लंडचा सूपडा साफ, तर न्यूझीलंडची गरुडझेप; WTC Points टेबलमध्ये मोठी उलथापालथ
कर्णधारपदाची जबाबदारी दिल्यास हॅरी ब्रूकची कामगिरी अधिक चांगली होऊ शकते. फलंदाज म्हणून अत्यंत चांगली कामगिरी तो करत आहे. त्याच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता नसती तर त्याला उपकर्णधार पदाची जबाबदारी दिली गेली नसती. त्यामुळे ही जबाबदारी कोणाला मिळायला हवी असे मला विचाराल तर मी हॅरी ब्रूकला 100 टक्के पाठिंबा देईन.






