व्हीव्हीएस लक्ष्मण चीफ सिलेक्टर होणार? (फोटो- ians)
बीसीसीआय चीफ सिलेक्टर म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या नावाचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. अजित आगरकर यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०२६ मध्ये संपत आहे. 2027 च्या वर्ल्डकपपर्यंत त्यांना संधी दिली जाईल असे वाटत होते. मात्र आता मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची निवड केली जाऊ शकते. तसे झाल्यास चीफ सिलेक्टर म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण यांना वर्षाला किती पगार मिळू शकतो किंवा मिळेल? याबाबत जाणून घेऊयात.
व्हीव्हीएस लक्ष्मण सध्या भारतीय क्रिकेटच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसचे प्रमुख आहेत. तिथून त्यांची पदोन्नती चीफ सिलेक्टर म्हणून केली जाऊ शकते. व्हीव्हीएस लक्ष्मण चीफ सिलेक्टर झाल्यास त्यांच्या मानधनात देखील वाढ होऊ शकते. पूर्वीपेक्षा बीसीसीआयने चीफ सिलेक्टरच्या वार्षिक पगारात वाढ केल्याचे पाहायला मिळत आहे.
‘Vaibhav Suryavanshi ने आपल्या फिटनेसवर…’; कोच व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे मोठे विधान
चीफ सिलेक्टरला किती असतो पगार?
बीसीसीआय पूर्वी चीफ सिलेक्टर पदावर असणाऱ्या या व्यक्तीला १ कोटी रुपये वार्षिक पगार द्यायची. मात्र आता बीसीसीआयने या रकमेत वाढ करून त्याची वार्षिक पगारची किंमत 3 कोटी रुपये इतकी केली आहे. तर निवड समितीच्या इतर सदस्यांना वार्षिक 90 लाख रुपये पगार दिला जातो. म्हणजेच व्हीव्हीएस लक्ष्मण हे चीफ सिलेक्टर झाल्यास त्यांना वार्षिक 3 कोटी रुपये पगार दिला जाऊ शकतो. किंवा त्यांचा अनुभव कामगिरी वाहता त्यामध्ये वाढ देखील केली जाऊ शकते.
ज्युनियर सिलेक्शन कमिटी
चीफ सिलेक्टर – वार्षिक 65 लाख रुपये
निवड समितीचे इतर सदस्य – 60 लाख प्रत्येकी
महिला वरिष्ठ संघ
चीफ सिलेक्टर – 30 लाख रुपये वार्षिक
इतर सदस्य – 25 लाख रुपये प्रत्येकी
वाट लावली अन् खापर दुसऱ्यांवर! Gautam Gambhir ची खुर्ची धोक्यात? श्रीलंका दौरा ठरवणार भविष्य
या वार्षिक पगाराव्यतिरिक्त निवड समितीच्या सदस्यांना दौरे, सामने आणि बैठकांदरम्यान दैनंदिन भत्ता आणि प्रवासाचा खर्च बीसीसीआयकडून वेगळा दिला जातो.






