DC vs LSG : लखनौ सुपर जायंट्सचे डिसीसमोर 210 धावांचे आव्हान(फोटो:सोशल मीडिया)
DC vs LSG : 18 व्या हंगामातील चौथा सामना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. विशाखापट्टणमधील डॉ वायएस राजशेखरा रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाता आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. निकोलस पूरन आणि मिचेल मार्श यांच्या अर्धशतकांच्या जोरावार लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर धावांचे 210 आव्हान उभे केले आहे. यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिट्ल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर लखनौ सुपर जायंट्सचं संघाची धुरा स्टार फलंदाज ऋषभ पंतकडे आहे. दिल्ली कपिटल्स प्रथम फलंदाजी करत 209 धावांपर्यंत मजल मारली आहे. एलएसजीकडून निकोलस पूरने सर्वाधिक 75 धावांची तडाखेबाज खेळी केली. तर दिल्ली कॅपिट्ल्सकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 2 विकेट्स विकेट्स घेतल्या आहेत.
दोन्ही संघांचा या मोसमातील हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघात विजयी सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. एडन मार्कराम आणि मिचेल मार्श या सालामीवीरांनी लखनौ सुपर जायंट्सला चांगली सुरवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेट्ससाथी 46 धावांची भागीदारी रचली. एडन मार्करामच्या रूपात एलएसजीला पहिला झटका बसला. मार्करामने 13 चेंडूत 15 धावा केल्या. त्याला विपराज निगमने तंबूचा रास्ता दाखवला.
हेही वाचा : पहा Video : धोनीचा जलवा कायम, मैदानात एंट्री होताच नीता अंबानींना झाकावे लागले कान..
त्यांनंतर आलेल्या निकोलस पूरनने दिल्ली कपिटल्सच्या गोलंदाजांची चांगलीच पिटाई करण्यास सुरवात केली. त्याआधी मिचेल मार्शने 72 धावांची वेगवान खेळी केली. त्याने 36 चेंडूत 72 धावा चोपल्या. त्याने या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकार लगावले. त्याला मुकेश कुमारने माघारी धाडले. त्यानंतरही निकोलस पुरन काळ बनून दिल्ली कॅपिट्ल्सच्या गोलंदाजांच्या मागे लागला. तो धोकादायक होत चालला असे वाटत असताना मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्याने केवळ 30 चेंडूत 75 धावांची तुफानी खेळी साकारली. या दरम्यान त्याने 6 चौकार आणि 7 षटकार ठोकले.
चौथ्या क्रमांकावर आलेला एलएसजीचा कर्णधार ऋषभ पंत मात्र झटपट बाद झाला. त्याला या सामन्यात भोपळा देखील फोडता आला नाही. त्याला फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने जाळ्यात अडकवले. तो 6 चेंडूत 0 धावांवर बाद झाला. त्या नंतर आलेल्या आयुष बडोनीला(5 चेंडूत 4 धावा) ही फार काही करता आले नाही. कुलदीप यादवने त्याचा काटा काढला.तर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या शार्दुल ठाकूर धावबाद झाला. तो 2 चेंडूत 1 धाव करत माघारी परतला. तर डेव्हिड मिलरने छोटेखानी वेगवान खेळी करत 19 चेंडूत 27 धावा काढून नाबाद राहिला. तसेच दिग्वेश राठी शून्य धावांवर नाबाद राहिला.
दिल्ली कॅपिट्ल्सकडून मिचेल स्टार्कने(4 ओव्हरमध्ये 42 रन्स) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या तर कुलदीप यादवने 4 ओव्हरमध्ये 20 रन्स देत 2 विकेट्स घेतल्या. तर विपराज निगम यानी मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. मोहित शर्मा, ट्रिस्टन स्टब्स आणि कर्णधार अक्षर पटेल यांच्या वाट्याला मात्र विकेट आली नाही.
हेही वाचा : IPL 2025 : CSK संघात रिंग मास्टर कोण? थालाने तोडली चुप्पी..; म्हणाला ‘मी फक्त सल्ला..’
एडेन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत, डेविड मिलर, प्रिंस यादव, दिग्वेश राठी, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकुर और रवि बिश्नोई.
जैक फ्रेजर-मैगर्क, फाफ डुप्लेसी, अभिषेक पोरेल, समीर रिज्वी, अक्षर पटेल (कप्तान), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.