फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
India vs Australia Pitch Report : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. या दोन्ही संघांमध्ये मागील काही सामन्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. या दोन्ही संघांमध्ये बऱ्याचवेळा मोठ्या आयसीसी स्पर्धेमध्ये एकमेकांना अपसेट दिला आहे. आता आज चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलमधे दोन्ही संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर आव्हान उभे राहणार आहेत. आतापर्यंत दोन्ही संघांनी एकही सामना न गमावता उपांत्य फेरी गाठली आहे. आज दोन्ही संघाची खरी चॅम्पियन ट्रॉफीची परीक्षा असणार आहे. भारताचा संघाचा कर्णधार रोहित शर्माने त्याची कॅप्टन्सी स्किल्स अप्रतिम रित्या दाखवले आहे.
आज त्याची खरी परीक्षा दुबईच्या मैदानावर असणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ आज संघाचे कर्णधार पद सांभाळले. ग्रुप B चे तीन सामने पावसामुळे वाहून गेले आहेत. चॅम्पियन ट्रॉफीचे यजमान पद पाकिस्तानकडे आहे पण सुरक्षेच्या कारणामुळे भारताचा संघ दुबईमध्ये सामने खेळत आहे. आज दुबईची खेळपट्टी कोणाला अनुकूल आहे त्याचबरोबर गोलंदाजांचा दबदबा असणार की फलंदाजांचा यावर एकदा नजर टाका.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याआधी भारताचे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय खेळपट्टीवर खेळवण्यात आले. यावेळी तीनही सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने चार फिरकी गोलंदाजांच्या जोरावर सामना जिंकला होता. दुबईच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज त्यांची पकड बनवण्यात यश मिळवले आहे तर त्याचबरोबर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी संघाला अनुकूल परिस्थिती आहे.
भारताच्या संघाने न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या लीग सामन्यामध्ये ९ विकेट्स घेतले होते तर भारताच्या संघाने कमी धावसंख्येचे आव्हान ठेवूनही सामना जिंकला आहे. यामध्ये भारताचा दमदार फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती संघासाठी ट्रम्प कार्ड ठरला आणि त्याने पाच विकेट्स नावावर करण्यात यश मिळवले. हे मैदान धावांचे पाठलाग करण्यात बऱ्याचदा यश मिळवले आहे त्यामुळे जो संघ नाणेफेक जिंकेल तो संघ फिल्डिंग करणे पसंत करेल.
India and Australia battle it out in the first semi-final of #ChampionsTrophy 2025. Who’s making the final? 🤔
How to watch 👉 https://t.co/S0poKnxpTX pic.twitter.com/lMBp8iEyIc
— ICC (@ICC) March 4, 2025
दुबई आंतरराष्ट्रीय खेळपट्टीवर फलंदाजी करणाऱ्या संघाने आतापर्यंत २३ सामने जिंकले आहेत तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ३६ सामने जिंकले आहेत. या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या आज ३५५/ ५ एवढी झाली आहे. तर सर्वात कमी धावसख्या ९१ इतकी आहे. या मैदानावर सर्वाधिक धावांचा पाठलाग करताना २८७/८ अशी धावसंख्येचा चेज करण्यात आला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ एकमेकांचे कट्टर विरोधी आहेत. ऑस्ट्रेलियाने २०२३ मध्ये भारतात झालेल्या खेळपट्टीवर टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये अपसेट दिला होता. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय सामन्यांच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, दोघांनीही आपापसात एकूण १५१ सामने खेळले आहेत. या काळात ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा होता. ऑस्ट्रेलियाने ८४ सामने जिंकले तर भारताने ५७ सामने जिंकले. १० सामन्यांचा निकाल लागला नाही. तथापि, भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला दोनदा पराभूत केले आहे. १९९८ मध्ये ढाका येथे झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ४४ धावांनी आणि २००० मध्ये नैरोबी येथे झालेल्या सामन्यात २० धावांनी पराभव केला होता.