सौजन्य - BCCI फिरकीपटूंसमोर भारतीय फलंदाज फ्लॉप, गौतम गंभीरने केला भारतीय खेळाडूंचा पर्दाफाश
IND vs NZ 3rd Test Gautam Gambhir : पुण्यातील गहुंजे येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर टीम इंडियावर चोहोबाजूंनी टीका झाली. त्यानंतर उद्यापासून तिसरी कसोटी सुरू होणार आहे. उद्या म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत टीम इंडियाची कामगिरी आतापर्यंत खूपच खराब झाली आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने मालिका गमावली आहे. या मालिकेत भारतीय फलंदाजी अनेक प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडली आहे. टीम इंडियाचे खेळाडू त्यांच्याच घरच्या मैदानावर फिरकीपटूंसमोर कमकुवत ठरले आहेत. याचेच कारण आज पत्रकार परिषदेत गौतम गंभीर याने स्पष्ट केली, त्याचबरोबर टेस्ट क्रिकेट हे क्वालिटीचे क्रिकेट आहे, तसेच डिफेन्स हे त्याचा आधार असल्याचे म्हटले आहे.
फिरकीला खेळण्याचे कौशल्य कमी झालेय
पुणे कसोटीत टीम इंडियाच्या 20 पैकी 18 विकेट फिरकीपटूंच्या नावावर होत्या. अशा स्थितीत फिरकी गोलंदाजी खेळण्याचे भारतीय फलंदाजांचे कौशल्य कमी झाले आहे, असा प्रश्न अनेक दिग्गजांनी उपस्थित केला आहे. आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या मुद्द्यावरून आपल्या खेळाडूंचा बचाव केला आहे. यासोबतच त्याने फिरकीपटूंविरुद्ध फ्लॉप होण्याचे कारणही दिले आहे.
भारतीय फलंदाजांवर गंभीरचे मोठे वक्तव्य
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मुंबई कसोटी सामन्यापूर्वी भारतीय फलंदाजांचे फिरकी गोलंदाजीचे कौशल्य गेल्या काही वर्षांत कमी झाल्याचे दावे फेटाळून लावले. न्यूझीलंडविरुद्ध पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आणि संघाला 113 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. तिसऱ्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत गंभीरला विचारण्यात आले की भारतीय फलंदाजांचे फिरकी खेळण्याचे कौशल्य कमी झाले आहे का, तेव्हा तो म्हणाला, ‘माझा यावर विश्वास नाही. कधी कधी विरोधी संघालाही श्रेय द्यावे लागते. गेल्या सामन्यात मिचेल सँटनरने शानदार गोलंदाजी केली होती. पण आपल्याला सतत मेहनत करावी लागेल. आमचे खेळाडू खूप मेहनत घेत आहेत.
टी-20 फलंदाजीची कला संपुष्टात
पण टी-२० क्रिकेटमुळे बचावात्मक फलंदाजीची कला प्रभावित झाल्याचे गंभीरला वाटते. आक्रमक क्रिकेट खेळण्याची आता क्रिकेटपटूंना सवय झाली असून त्यामुळे बचावात्मक फलंदाजीच्या कलेवर परिणाम झाला आहे. तो म्हणाला, ‘कधीकधी तुम्हाला चेंडू मारण्याची इतकी सवय होते की तुम्ही आठ किंवा दहा वर्षांपूर्वी जसे खेळायचे तसे बचावात्मक खेळणे विसरता. पूर्ण क्रिकेटपटू तो असतो जो टी-२० फॉरमॅट आणि टेस्ट क्रिकेट या दोन्हीमध्ये यश मिळवतो. तो परिस्थितीशी लगेच जुळवून घेतो.

टी-२० क्रिकेटमुळे बचावात्मक फलंदाजीची कला प्रभावित