ऋषभ पंत आणि शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
LSG vs GT : आयपीएल २०२५ च्या १८ वा हंगाम चांगलाचा रंगात आला असून आतापर्यंत 25 सामने खेळण्यात आले आहेत. आज २६ वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. ऋषभ पंतने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. शेवटच्या सामन्यात लखनौ संघाने कोलकात्याचा ४ धावांनी पराभव केला होता. तर गुजरातने सनरायझर्स हैदराबादचा ७ विकेट्सने पराभव करून विजय संपादन केला होता. आजच्या सामन्यात दोन्ही संघ जिंकण्याच्याच इराद्याने मैदनात उतरणार आहेत.
हेही वाचा : Birthday special : नंबर १ ते ११ पर्यंत फलंदाजीचे अनेक कारनामे, ‘मांकडिंग’ प्रकारालाही दिला जन्म अन् करियर..
दोन्ही संघ त्यांचे मागील सामने जिंकल्यानंतर एकमेकांशी भिडणार आहेत. गुजरात टायटन्स संघ आयपीएल २०२५ मधील ५ पैकी ४ सामने जिंकून पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर, लखनौ सुपर जायंट्स संघ ५ सामन्यांत ३ विजयांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. अशा वेळी, लखनौ संघ हा सामना जिंकून पॉइंट टेबलमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. गुजरात हा सामना जिंकून आपले अव्वल स्थान अधिकम भक्कम करण्यासाठी प्रयत्न करेल.
लखनौच्या एकाना स्टेडियमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर मनाली जाते. तसेच या वर्षी खेळपट्टीत बदल दिसून येत आहे. आता इथे फलंदाज सहज धावा काढू शकतात. या खेळपट्टीवर, नवीन चेंडू वेगवान गोलंदाजांना मदत करताना दिसतो आणि चेंडू जुना झाल्यानंतर तो फिरकी गोलंदाजांना चांगली मदत करतो.
हेड टू हेड
लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एकूण ५ सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये गुजरातने वरचष्मा दाखवत ४ विजय मिळवले. तर लखनौ संघाला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. गेल्या वर्षी लखनौने गुजरातवर एकमेव विजय मिळवला. हा विजय लखनौच्याच मैदानावर झाला होता.
लखनौ सुपर जायंट्सचे संभाव्य ११ खेळाडू: मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, आवेश खान, दिग्वेश राठी
गुजरात टायटन्सचे संभाव्य ११ खेळाडू: साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा