भारत-पाकिस्तान येणार आमनेसामने (फोटो- सोशल मीडिया)
14 जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान लढत
हरमनप्रीत कौर करणार भारतीय संघाचे नेतृत्व
इंग्लंडमध्ये होणार महिला वर्ल्ड कप स्पर्धा
Women’s T20 World Cup 2026: 12 जूनपासून भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये महामुकाबला होणार आहे. या सामन्याकडे जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आयसीसी महिला टी-२० विश्वचषक 2026 च्या निमित्ताने दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. 14 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे.
12 जूनपासून आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. ही स्पर्धा इंग्लंड आणि श्रीलंकामध्ये होणार आहे. 12 जून ते 5 जुलै पर्यन्त वर्ल्ड कप स्पर्धा सुरू असणार आहे. अंतिम सामना प्रसिद्ध लॉर्डस मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय महिला क्रिकेट आधीच इंग्लंडला रवाना झाला होता. इंग्लंडविरुद्ध भारताने टी-20 सामन्यांची मालिका खेळवली गेली. या मालिकेत भारताचा पराभव झाला आहे. मात्र आता वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारत सज्ज झाला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघ आपला पहिलं सामना 14 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. हा सामना महामुकाबला म्हणून पाहिला जाणार आहे. यावेळच्या विश्वचषकात एकूण 12 संघ सहभागी होत असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.
ग्रुप १: भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि नेदरलँड्स.
ग्रुप २: इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, स्कॉटलंड आणि आयर्लंड.
| तारीख | सामना | ठिकाण | वेळ (IST) |
| १४ जून (रविवार) | भारत विरुद्ध पाकिस्तान | बर्मिंगहॅम (Edgbaston) | संध्या. ६:३० वाजता |
| १७ जून (बुधवार) | भारत विरुद्ध नेदरलँड्स | लीड्स (Headingley) | संध्या. ७:०० वाजता |
| २१ जून (रविवार) | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका | मॅनचेस्टर (Old Trafford) | संध्या. ७:०० वाजता |
| २५ जून (गुरुवार) | भारत विरुद्ध बांगलादेश | मॅनचेस्टर (Old Trafford) | संध्या. ७:०० वाजता |
| २८ जून (रविवार) | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया | लंडन (Lord’s) | संध्या. ७:०० वाज |
ICC च्या घोषणेनुसार, Women’s T20 World Cup 2026 जिंकणाऱ्या संघाला २३,४०,००० अमेरिकन डॉलर्स रक्कम मिळणार आहे. ही रक्कम आयपीएल विजेत्या आरसीबीला मिळालेल्या बक्षीस रकमेपेक्षाही जास्त असणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला २०२६ चा महिला टी२० विश्वचषक जिंकल्याबद्दल २० कोटी रुपये मिळाले होते.
उपविजेत्यावरही पैशांचा वर्षाव केला जाईल
महिला टी२० विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेतील उपविजेत्या संघाला ११,७०,००० अमेरिकी डॉलर्स मिळतील. दोन्ही उपांत्य फेऱ्यांमधील पराभूत संघांना ६,७५,००० अमेरिकी डॉलर्स मिळतील. स्पर्धेतील प्रत्येक गट सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला स्वतंत्र बोनसही दिला जाणार आहे. प्रत्येक विजेत्या संघाला ३१,१५४ अमेरिकी डॉलर्स मिळणार आहे. विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व १२ संघांना किमान २,४७,५०० अमेरिकी डॉलर्सचा बक्षीस निधी मिळणार आहे. त्यामुळे लहान संघांनाही आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे.






