IML 2025 Final LIVE Score: वेस्ट इंडिज मास्टर्सचे इंडिया मास्टर्स संघासमोर विजयासाठी 149 धावांचे आव्हान; लेंडल सिमन्स चमकला.. (फोटो-सोशल मीडिया)
IML 2025 Final : आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या पहिल्या हंगामाचा अंतिम सामाना सुरू आहे. वेस्ट इंडिज मास्टर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिज मास्टर्सने लेंडल सिमन्सच्या अर्धशतकाच्या जोरावर 149 धावांचे आव्हान दिले आहे. रायपूरच्या SVNS आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अंतिम सामना रंगला आहे. सचिन तेंडुलकर इंडिया मास्टर्सचे नेतृत्व करत आहे, तर ब्रायन लारा वेस्ट इंडिज मास्टर्स संघाची धुरा सांभाळत आहे.
वेस्ट इंडिज मास्टर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 148 धावांपर्यंत मजल मारली आहे. लेंडल सिमन्सने अर्धशतकी पारी खेळली आहे. त्याने 14 चेंडूत 57 धावा केल्या आहेत. ब्रायन लारा फार काही करू शकला नाही. तो 6 चेंडूत 6 धावा करून विनय कुमारचा शिकार ठरला. तसेच ड्वेन स्मिथने 35 चेंडूत 45 धावांची तुफानी खेळी केली. त्याला शाहबाज नदीमने माघारी पाठवले. रामदीन 17 चेंडूत 12 धावा करून नॉट आऊट राहिला.
लेंडल सिमन्स, ड्वेन स्मिथ आणि दिनेश रामदिन यांच्या व्यतिरिक्त कुणाला दोन अंकी संख्या गाठता आली नाही. वेस्ट इंडिज मास्टर्सकडून लेंडल सिमन्स सर्वाधिक धावा केल्या आहेत. इंडिया मास्टर्सकडून विनय कुमारने सर्वाधिक 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आहे. तर शाहबाज नदीमने एक ओव्हर मिडन टाकत 12 धावांत 2 बळी घेतले. पवन नेगी आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी प्रत्येकी 1-1 विकेट्स घेतली. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया मास्टर्सला आयएमएल 2025 चे विजेतपद पटकवण्यासाठी 149 धावा कराव्या लागणार आहेत.
हेही वाचा : Virat Kohli : किंग कोहलीची बीसीसीआयविरोधात ‘विराट’ डरकाळी; खेळाडूंसाठीचे नियम चुकीचे, आवाज उठवणार..
रायपूरच्या SVNS आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा इंडिया मास्टर्स आणि वेस्ट इंडिज मास्टर्सचे नेतृत्व करत आहेत. स्पर्धेपूर्वी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या इंडिया मास्टर्सने आयएमएलमध्ये जवळपास चमकदार कामगिरी केली आहे. गुरुवारी पहिल्या उपांत्य फेरीत शेन वॉटसनच्या संघाचा पराभव करून साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया मास्टर्सविरुद्धच्या एकमेव पराभवाचा बदलाही घेतला आणि इंडिया मास्टर्सने अंतिम फेरी धडक मारली आहे.
तर वेस्ट इंडिज मास्टर्सने श्रीलंका मास्टर्सला पराभूत करत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. दोन्ही संघा तुल्यबळ असून दोन्ही संघामध्ये अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. अशावेळी अंतिम सामना हा चांगलाच अतिटतीचा होण्याची शक्यता वर्तवली जाता आहे.
वेस्ट इंडिज मास्टर्स (प्लेइंग इलेव्हन): ब्रायन लारा (c), विल्यम पर्किन्स, लेंडल सिमन्स, ड्वेन स्मिथ, चॅडविक वॉल्टन, दिनेश रामदिन (विकेटकीपर), ऍशले नर्स, टिनो बेस्ट, जेरोम टेलर, सुलेमान बेन, रवी रामपॉल.
इंडिया मास्टर्स (प्लेइंग इलेव्हन): सचिन तेंडुलकर (कर्णधार), अंबाती रायडू (विकेटकीपर), युवराज सिंग, पवन नेगी, स्टुअर्ट बिन्नी, युसूफ पठाण, इरफान पठाण, गुरकीरत सिंग मान, विनय कुमार, शाहबाज नदीम, धवल कुलकर्णी.