देवदत्त पडीकल विरुद्ध सी सुदर्शन (फोटो- फोटो - सोशल मिडिया )
श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सिरिजमध्ये भारतीय संघ प्लेइंग 11 मध्ये साई सुदर्शन किंवा देवदत्त पडीकलपैकी एकालाच संधी दिली जाऊ शकते. प्रथम आपण साई सुदर्शनबाबत जाणून घेऊयात. साई सुदर्शन देवदत्त पडीकलपेक्षा अधिक सामने खेळला आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत एकूण 7 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 383 रन्स केल्या आहेत. यामध्ये त्याने तीन अर्धशतक लगावली आहे. मात्र त्याचे रूपांतर तो शतकी खेळीत करू शकला नाही.
WTC मध्ये भारतीय फलंदाज फ्लॉप! मात्र Shubhman Gill 157 रन्स करताच करणार ‘हा’ रेकॉर्ड
देवदत्त पडीकलच्या कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास देवदत्त पडीकलने भारतीय संघासाठी आतापर्यंत केवळ 2 कसोटी सांनी खेळले आहेत. यामध्ये त्याने तीन इनिंगमध्ये 90 रन्स केल्या आहेत. त्याच्या नावावर एका अर्धशतकाची नोंद आहे. त्यामुळे जास्त सामने खेळले असल्यामुळे साई सुदर्शनची कामगिरी जास्त चांगली दिसून येत आहे. मात्र आता भारतीय संघात कोणाला स्थान मिळणार की दोघांना संधी दिली जाणार हे पहावे लागणार आहे.
साई सुदर्शनने गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये अत्यंत चांगले प्रदर्शन केले आहे. आयपीएलमध्ये देखील त्याने गुजरात टायटन्सकडून चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या सिरिजमध्ये भारतीय संघात साई सुदर्शनलाच संधी मिळण्याचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच कडची नवीन खेळाडू तयार व्हावेत. त्यासाठी देवदत्त पडीकलला संधी दिली जाऊ शकते. किंवा दोघांना एक एक सामन्यात खेळवले जाऊ शकते. त्यामुळे दोघांपैकी कोण खेळणार आणि कोण नाही हे 15 ऑगस्ट रोजीच संजू शकणार आहे.
IND Vs SL: ‘सर’ जाडेजा मोडणार सेहवागचा ‘हा’ रेकॉर्ड; श्रीलंकेविरुद्ध कधीपासून सुरू होणार सिरिज?






