वैभव सूर्यवंशी अन् श्रीलंकेचे खेळाडू भिडले (फोटो- @AGM9089/ट्विटर)
वैभव सूर्यवंशी श्रीलंका खेळाडूंशी भिडला
श्रीलंकेने केला भारताचा पराभव
ट्राय सिरिजमध्ये भारताचा दूसरा पराभव
India A Vs SRI Lanka A Updates: श्रीलंकेत सुरू असलेल्या ट्राय सिरिजमध्ये आज भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात सामना पर पडला. भारताने श्रीलंकेला २६६ रन्सचे टार्गेट दिले होते. हा सामना सुपर ओव्हरपर्यंत गेल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात श्रीलंकेने भारताचा पराभव केला आहे. मात्र सामना झाल्यावर श्रीलंकेचे खेळाडू आणि वैभव सूर्यवंशी यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
२६६ रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ आणि भारत यांच्यात सामना टाय झाला. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये सुपर ओव्हर खेळवण्यात आली होती. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १६ रन्स केल्या. भारताला जिंकण्यासाठी १७ रन्सची गरज होती. मात्र भारत केवळ १५ रन्स करून शकला. भारताचा २ रन्सने पराभव झाला. मात्र त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेचे खेळाडू भिडल्याचे पहायला मिळाले.
IND vs AFG 2nd ODI Pitch Report: लखनौची खेळपट्टी कोणाला साथ देणार? भारताकडे मालिका जिंकण्याची संधी
प्रकरण काय?
सामना पूर्ण झाल्यावर वैभव आणि श्रीलंकेचे खेळाडू आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. सुपर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर वैभव सूर्यवंशी रन करू शकला नाही. त्यामुळे भारत पराभूत झाला. त्यानंतर श्रीलंकेचे खेळाडू जल्लोष करत होते. त्यातील काही जणांनी सुयश शेडगे आणि वैभवच्या दिशेने पाहून काहीतरी भाष्य केले.
SL bowlers were misbehaving with Vaibhav for long Be ready for Vaibhav Sooryavanshi belt treatment next time 👍pic.twitter.com/OzKqtRcqmc — 𝔸🅖︎𝕄 (@AGM9089) June 15, 2026
त्यानंतर वैभव आणि श्रीलंकेचा खेळाडू भिडले. वैभवने त्याला धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. दोन्हीकडून धक्काबुक्की केले गेली. मात्र तेव्हा अन्य खेळाडू मध्ये आले आणि हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस वैभव सूर्यवंशी प्रचंड रागात असल्याचे पाहायला दिसून आले. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
IND A Vs SL A Live: विजयाच्या उंबरठ्यावरून मॅच निसटली! सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारत पराभूत
सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारत पराभूत
श्रीलंकेत सध्या भारत, श्रीलंका आणि अफगणिस्तानमध्ये ट्राय सिरिज सुरू आहे. आज या स्पर्धेत भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले होते. भारताने आजच्या सामन्यात सुयश शेडगेच्या खेळीच्या जोरावर भारताने २६५ रन्स केल्या. भारताने श्रीलंकेला २६६ रन्सचे टार्गेट दिल होते. अखेर शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना कोण जिंकणार हे समजून येत नव्हते. अखेर या सामन्यात सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने भारताला पराभूत केले आहे.






