भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया : वर्ल्ड कप आधी भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन वनडे मालिका खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. संघाची कमान केएल राहुलच्या हाती असेल. आर अश्विनचे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, तिसऱ्या वनडेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या संघात परतणार आहेत. वर्ल्ड कप सारख्या मोठी स्पर्धा पाहता बीसीसीआयने पहिल्या दोन एकदिवसीय सामान्यांमधून वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचबरोबर वर्ल्ड कप मध्ये सुद्धा भारताच्या संघामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे निवडकर्त्यांना बदलीचा विचार करावा लागणार आहे. आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना तिन्ही एकदिवसीय सामन्यांसाठी संघात ठेवण्यात आले आहे. अश्विन आणि सुंदरपैकी एकाला विश्वचषकाचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा देखील संघात आहेत. मात्र हे तिन्ही खेळाडू तिसऱ्या वनडेत संघासोबत नसतील. मात्र, संजू सॅमसनची एकाही सामन्यासाठी निवड झालेली नाही. यावरून संजू सॅमसनसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पहिल्या दोन वनडेसाठी संघ: केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा , प्रसिध कृष्णा, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.
तिसऱ्या वनडेसाठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.