भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून भारत विरुद्ध झिम्बाब्वे(India Vs Zimbabwe) एकदिवसीय (ODI)मालिका खेळवली जात आहे. १८ ऑगस्ट रोजी मालिकेतील झालेला पहिला सामान भारताने १० विकेट्सने जिंकला असून सध्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. आज शनिवारी २० ऑगस्ट रोजी मालिकेतील दुसरा सामान खेळवला जाणार असून याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
भारत तब्बल सहा वर्षानंतर झिम्बाब्वे दौरा करत असून या दौऱ्यात भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. कर्णधार के एल राहुल आणि उप कर्णधार शिखर धवन यांच्याकडे संघाची धुरा असून झिम्बाब्वे दौऱ्यातील भारतीय संघात नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पहिला सामना भारताने १० गडी राखून १९२ धावा करत खिशात घातला.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे या मालिकेतील दुसरा सामना आज शनिवारी होणार असून हा सामान भारताने जिंकल्यास भारत २-० अशी विजयी आघाडी घेईल. तर झिम्बाब्वे संघाने सामना जिंकल्यास मालिका १-१ अशी बरोबरी साधेल. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे.
भारतीय संघ – केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाझ अहमद.
झिम्बाब्वे संघ – रेगीस चकाब्वा (कर्णधार), रायन बुर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, इनोसंट काया, ताकूदझ्वँनशी केईतानो, क्लाईव्ह मडांडे (यष्टीरक्षक), वेस्ली मॅदवेर, तदीवांशे मरुमानी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगो, रिचर्ड येनगारावा, व्हिक्टर एनवायुची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरीपानो.
भारतीय संघात बदल होणार ?
पहिल्या वनडेमध्ये भारताने तब्बल १० विकेट्सनी विजय मिळवला. झिम्बाब्वेचं १९० धावाचं लक्ष भारताच्या गिल आणि धवन जोडीने अनुक्रमे 82 आणि ८१ रन करुन पूर्ण केलं. पण असं असतानाही दुसऱ्या सामन्यात केएल राहुल सलामीला येण्याची शक्यता आहे. कारण केएल राहुल मागील बऱ्याच काळापासून दुखापतीमुळे संघाबाहेर होता. आता तो संघात कर्णधार म्हणून आला असताना आगामी आशिया कपसाठी त्याला सराव म्हणून या मालिकेत अधिक खेळणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो सलामीलाच मैदानात उतरु शकतो.