भारत आणि झिम्बाब्वे (India Vs Zimbabwe) यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु असून आज या मालिकेतील तिसरा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघ(Indian Cricket Team) तब्बल सहा वर्षांनी झिम्बाब्वे दौऱ्यावर असून भारतीय संघात यंदा नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. कर्णधार के एल (K L Rahul) राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघाने या मालिकेतील दोन क्रिकेट सामने जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे भारताने मालिका खिशात घातली असून आता तिसरा सामना जिंकून मालिका विजयासाठी भारत सज्ज आहे.
आज २२ ऑगस्ट रोजी भारत विरुद्ध झिम्बाब्वे या मालिकेतील तिसरा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी १२:४५ वाजता सुरू होणार असून सुमारे अर्धातास अगोदर नाणेफेक केली जाणार आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह प्रसारण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर दाखवले जाणार असून तर, या सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अॅपवर प्रेक्षक पाहू शकणार आहेत.
भारतीय संघ:
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाझ अहमद.