Sania Mirza-Mohammed Shami : काय सांगता? सानिया मिर्झा-मोहम्मद शमी लग्नगाठ बांधणार?;(फोटो-सोशल मीडिया)
Sania Mirza-Mohammed Shami : सानिया मिर्झा सोशल मिडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिच्या आयुष्याशी निगडित प्रत्येक अपडेट तिच्या चाहत्यां शेअर करता असते. कदाचित याच कारणामुळे सानिया मिर्झाचे नाव यावेळी देखील सर्वाधिक आवडत्या स्पोर्ट्स लोकांमध्ये सामील झाले आहे. आता अशातच ती भारतात आल्यानंतर दुबईला परतली आहे. सानिया मिर्झा खूप वेळा चर्चेत असते. आता देखील ती एका कारणाने चर्चेत आली आहे.
सानिया मिर्झा सध्या तिचा मुलगा इझानसोबत दुबईत राहत आहे. ती दरवेळी रमजानच्या निमित्ताने काहीतरी शेअर करत असते. बऱ्याच वेळा ती अशा पोस्ट करत असते. त्या पोस्टचे अनेक अर्थ अर्थ निघत असतात. यावेळी देखील तिने एक पोस्ट केलीय आहे. त्या पोस्टवर सानिया मिर्झाला लग्नाचा एक सल्ला देण्यात आला आहे.
भारतीय संघाचा तारांकित गोलंदाज मोहम्मद शमी सध्या तेच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. तो चांगली कामगिरी करताना डोसूनह येत आहे. शमी नाव सानियासोबत खूप वेळा जोडण्यात आले आहे. तसेच सानिया मिर्झा आणि शमी लग्न करणार असल्याच्या देखील अफवा पसरल्या होत्या. परंतु त्यामध्ये काही एक तथ्य नव्हते.
दरम्यान, सानियाने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सर्वांनी तिला खूप सुंदर म्हटले आहे. सानिया मिर्झा नेहमीच स्वत:मध्ये ताकद असल्याबद्दल बोलत असे. काही चाहत्यांनी तिला देशाला होळीच्या शुभेच्छा देण्यास सांगितले. मात्र, सानियाने होळीसाठी कोणतीही अशी खास पोस्ट किंवा स्टोरी शेअर केलेली दिसून आलेली नाही.
सुंदर फोटो पाहून पुन्हा एकदा एका चाहत्याने शमीचा उल्लेख केला आहे. चाहत्याने सानिया मिर्झाला सल्ला दिला आहे की, ‘तू शमीशी लग्न कर, तो खूप चांगला माणूस आहे.’ तसेच काही वापरकर्त्यांनी सानियाला अप्सरा आणि काय नाही असे संबोधित केले. तर काही चाहत्यांनी सांगितले की आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो, असे म्हटले आहे.
हेही वाचा : IPL 2025 :आयपीएलपूर्वीच ‘या’ 3 संघांसाठी आनंदांचा जॅकपॉट; 5 तगड्या खेळाडूंचे होणार पुनरागमन..
सानियाने स्वतः लग्नाबाबत प्रतिक्रिया काय?
सानिया मिर्झा लग्नाबद्दल स्वतः कधीही काही बोलले नाही. मात्र, चाहते तिला पुन्हा लग्न करण्यास सांगत आहेत. शमीसोबतच्या लग्नाबाबत बोलल्यानंतर सानियाचे वडील पुढे आले आणि म्हणाले की, या सर्व गोष्टींमध्ये काही एक तथ्य नाही, लग्न होणार असल्याची कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या लग्नाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.