CSK VS RR : MS Dhoni ची विकेट अन् महिला फॅन रागाने लालबुंद(फोटो-सोशल मिडिया)
CSK VS RR : आयपीएल 2025 चा थरार आता चांगलाच रंगात येऊ लागला आहे.असाच एक थरारक सामना 30 मार्च रोजी अनुभवायला आला. गुहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने उभे ठाकले होते. या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंगचा 6 धावांनी पराभव केला. या विजयाने आयपीएलच्या 18 व्या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला आहे. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत चेन्नई सुपर किंग्जसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु चेन्नईला 6 गडी गमावत 176 धावाच करता आल्या. या सामन्यात एमएस धोनी यावेळी लवकर फलंदाजीला मैदानात उतरला. तो सीएसकेला सहज विजय मिळवून देईल असे वाटत होते. पण वास्तवात मात्र तसे काही झाले नाही. धोनी लवकरच बाद झाला. त्याच्या विकेटवर चाहत्यांचा चांगलाच संताप झाल्याचे दिसून आले. अशातच त्यातील एका महिला चाहतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर 9 गड्यांच्या बदल्यात 183 धावांचे लक्ष्य उभे केले होते. या सामन्यात सीएसके संघ खूप अडचणीत आला होता. त्यानंतर धोनी फलंदाजीला मैदनात आला. तो आला तेव्हा संघाला विजयासाठी 25 चेंडूत 54 धावांची गरज होती. सहसा अशा सामन्यांमध्ये धोनी सामना काढून देण्यात ओळखला जातो. मात्र, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनी 11 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. संदीप शर्माच्या चेंडूवर शिमरॉन हेटमायरने त्याचा अफलातून असा झेल घेतला, त्यानंतर धोनीला तंबूत परतावे लागले. या दरम्यान धोनी बाद झाल्यावर एका महिला चाहतीची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.
A CSK fan Girl emotional reaction 🙄( context -Shimron Hetmyer’s stunning catch that dismissed MS Dhoni during the IPL 2025 match between RRvsCSK)
pic.twitter.com/V0bfyyNlDj— stalker 😈 (@stalker_001R) March 31, 2025
हेही वाचा : एमएस धोनी जखमी? 9 व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचे कारण CSK प्रशिक्षक स्टीफन यांनी केले स्पष्ट
चेन्नई सुपर किंग्जला शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी 20 धावांची आवश्यकता होती. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर शिमरॉन हेटमायरने एमएस धोनीचा अफलातून झेल घेताच कॅमेऱ्यावर एक मुलगी दिसून आली. जी काहीच बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावर रागाचे भाव स्पष्टपणे दिसून येत होते. या महिला चाहतीने रागाच्या भरात बोटे देखील मोडली. या महिला चाहतीबाबत आता सोशल मीडियावर अनेक मीम्स देखील शेअर होऊ लागले आहेत.
हेही वाचा : MI vs KKR : मुंबई इंडियन्सला अजिंक्य रहाणे होमग्राउंडवर करणार पराभूत? जाणून घ्या कशी असेल वानखेडेची खेळपट्टी
Shimron Hetmeyer took a brilliant catch in the final over to dismiss MS Dhoni and potentially save the match for Rajasthan !! 👏👏#RRvCSK #RRvsCSK
— Cricketism (@MidnightMusinng) March 30, 2025
चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल 2025 मध्ये सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले आहे. सीएसके ने त्यांच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 4 विकेटने पराभव करत या हंगामची चांगली सुरवात केली होती. परंतु, त्यानंतर आरसीबी आणि काल गुहाटीत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नईला पराभूत केले. सध्या चेन्नईचा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.
आयपीएल 2025 तील 18 व्या हंगामात 30 मार्च रोजी गुहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने उभे ठाकले होते. या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंगचा 6 धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयाने आरआरने आयपीएलच्या 18 व्या हंगामातील आपला पहिला विजय संपादन केला आहे. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत चेन्नई सुपर किंग्जसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु चेन्नईला 6 गडी गमावत 176 धावाच करता आल्या.