SA Vs NZ Champions Trophy: किवींनी दाखवला दक्षिण आफ्रिकेला बाहेरचा रस्ता; 'चोकर्स'ला हरवत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)
SA vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर 50 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन हे दोन्ही शतकवीर विजयाचे शिल्पकार ठरले. दुबईत 9 मार्चला होणाऱ्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड भारतासोबत भिडणार आहे.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. रचीन रवींद्रसह केन विल्यमसनच्या शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे आव्हान ठेवले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी सेमी फायनलच्या दुसऱ्या सामन्यात रचीन रवींद्रने शतकी खेळी केली आहे. त्याने 101 चेंडूमध्ये 108 धावा केल्या आहेत. त्याला कासिगो रबडाने आऊट केले. तर केन विल्यमसनने 94 चेंडूचा सामना करत 102 धावा केल्या आहेत. त्याला विआन मुल्डरने माघारी पाठवले. तसेच ससलामीवीर विल यंग लुंगी एनगिडीने बाहेरचा रस्ता दाखवला.
हेही वाचा : SA vs NZ : न्यूझीलंडचा द. आफ्रिकेसमोर 362 धावांचा डोंगर; रचीन रवींद्रसह केन विल्यमसनची दमदार शतके..
डॅरिल मिशेलने फटकेबाजी करत 37 चेंडूमध्ये 49 धावांची खेळी केली. त्याला लुंगी एनगिडीने तंबूत पाठविले. तर टॉम लॅथम रबडाच्या चेंडूवर स्वस्तात बाद झाला. त्याने केवळ 4 धावाच केल्या. त्यांतर आलेला ग्लेन फिलिप्स 27 चेंडूमध्ये 49 धावांची ताबडतोब फलंदाजी करत नाबाद राहिला. तर मायकेल ब्रासवेलने 16 धावांची भर घातली आणि मिचेल सँटनर 2 धावा करत नाबाद राहीला.
दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीन सर्वाधिक 3 विकेट्स तर कसिगो रबडा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच विआन मुल्डरने एक विकेट्स घेतली. केशव महाराजला मात्र बळी टिपण्यात अपयश आले.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात धडक मारण्यासाठी दक्षिण आफ्रिका मैदानात उतरली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे टार्गेट ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरवात निराशाजनक झाली. सलामीवीर रायन रिकेल्टन 17 धावांवर मॅट हेनरीचा शिकार ठरला. त्यांनंतर आलेला रॅसी व्हॅन डेर ड्युसेन आक्रमक खेळ दाखवत धाव फलक हलता ठेवला. परंतु त्याला मिचेल सँटनरने आपल्या फिरकीत गुंतवले आणि डेर ड्युसेन 66 चेंडूत 69 धावा करून माघारी परतला.
तसेच सलामीवीर कर्णधार टेम्बा बावुमाने अर्धशतकी खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मिचेल सँटनरने बावुमाचा(71 चेंडूत 56 धावा) काटा काढला आणि बावुमाला तंबूचा रस्ता पकडावा लागला. चार नंबरवर आलेला एडन मार्करामडून (29 चेंडूत 31 धावा) दक्षिण आफ्रिकेला अपेक्षा होत्या. मात्र तो जास्त वेळ मैदानात तग धरू शकला नाही. त्याला रचिन रवींद्रने बाद केले. त्यांनंतर फॉर्मात असलेला हेनरिक क्लासेन फलंदाजीला आला. परंतु, 3 धावांवर त्याला सँटनरने माघारी धाडले. तर विआन मुल्डर 8 धावा करून बाद झाला. त्यांतर आलेला मार्को जॉन्सन 3 धावांवर ग्लेन फिलिप्सचा शिकार ठरला. केशव महाराजही (1 धाव) स्वस्तात बाद झाला. त्याला ग्लेन फिलिप्सने चालतं केलं. डेव्हिड मिलर एक बाजू लावून धरत 67 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी केली, परंतु दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरली.
न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनरने 29 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मॅट हेन्री आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर मायकेल ब्रेसवेलने 1 गडी बाद केला.
रायन रिकेल्टन, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, विआन मुल्डर, मार्को जॉन्सन, केशव महाराज, केशवजी महाराज, लुंगी एनगिडी
विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (क), मॅट हेन्री, काइल जेमिसन, मायकेल ब्रासवेल