CSK VS RR : 'Riyan Parag आयपीएलमधून बॅन करा!(फोटो-सोशल मीडिया)
CSK VS RR : आयपीएल 2025 मध्ये रविवारी 30 मार्च रोजी गुहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामाना खेळवण्यात आला होता. या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंगचा 6 धावांनी धुव्वा उडवला आहे. आरआरने या विजयासह आयपीएल 2025 मधील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. तर चेन्नई सुपर किंग्सला मात्र सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत चेन्नई सुपर किंग्जसमोर 183 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रतिउत्तरात चेन्नईला 176 धावाच करता आल्या आणि चेन्नईला सामना गमवावा लागला. या विजयानंतर आरआरचा कर्णधार रायन परागने अशी कृती केली. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
विजयानंतर रियान परागने आसाम क्रिकेट असोसिएशनने नियुक्त केलेल्या बॉलबॉय आणि ग्राउंड्समनसोबत एक सेल्फी घेतला. सेल्फी घेतल्यानंतर त्याने फोन कोणालाही परत न् देता उलट फोन हवेत फेकला आणि तेथून पुढे चालता झाला. यानंतर त्याने साधे मागे वळून देखील पाहिले नाही. परागच्या या कृत्याचा हा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा : CSK VS RR : ‘कॅप्टन कुल’कडून पाय मोडलेल्या ‘द वॉल’ची विचारपूस, तर नितीश राणानेही केली द्रविडसाठी खास कृती..
काही चाहत्यांना परागची ही कृती बिलकुल आवडली नाही. त्याच्या वृत्तीत उद्धटपणा भरलेला दिसत अस्लयचे बोलले जाता आहे. त्यानंतर त्याचा सोशल मीडियावर चांगलाच क्लास घेण्यात आला. त्याला आयपीएलमधून बॅन करा असे बोलले जाता आहे.
Attitude 🗿 Performance 🤡 pic.twitter.com/tNBZgSpRMA
— Sonu (@heyysonu_) March 31, 2025
या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 182 धावांचे आव्हानाचा बचाव केला आहे यानी 6 धावांनी विजय मिळवला. मात्र षटकं वेळेवर टाकता न आल्याने प्रभारी कर्णधार रियान परागला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाअ आहे. सामन्यानंतर रियान पराग म्हणाला की, संघाच्या या प्रयत्नामुळे तो खूप खूश असल्याचे सांगितले.
हेही वाचा : Viral Video : राजस्थान रॉयल्सने उडवली धोनीची खिल्ली? थाला बाद होताच लिहिले असे काही, वाचा सविस्तर…
रियान पराग म्हणाला की, आम्हाला वाटले की आम्ही 20 धावा अधिक करण्यात कमी पडलो. मधल्या षटकांमध्ये आम्ही चांगली कामगिरी करत होतो, पण आम्ही काही विकेट लवकर दिल्या. मात्र, आमच्या गोलंदाजांनी आमच्या योजना चांगल्या प्रकारे अमलात आणल्या. सूरुवातीला आम्ही विकेट गमावल्या तेव्हा ते कठीण वाटत होते. मी हसरंगाला एवढेच सांगितले की, जुने सामने विसरून फक्त आजच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करा. क्षेत्ररक्षण नेहमीच चांगले होते. मी येथे योगदान दिले याचा मला आनंद आहे. असेही पराग म्हणाला.