CSK VS RR : 'कॅप्टन कुल'कडून पाय मोडलेल्या 'द वॉल'ची विचारपूस(फोटो-सोशल मीडिया)
CSK VS RR : आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम सुरुवातीच्या टप्प्यात आहे. एकामागून एक थरारक सामने अनुभवायला मिळत आहेत. काल म्हणजे रविवारी 30 मार्च रोजी गुहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामाना खेळवण्यात आला होता. या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंगचा 6 धावांनी दणदणीत पराभव केला. आरआरने या विजयासह आयपीएल 2025 मधील पहिला विजय नोंदवला आहे. तर चेन्नई सुपर किंग्सला मात्र सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत चेन्नई सुपर किंग्जसमोर 183 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रतिउत्तरात चेन्नईला 176 धावाच करता आल्या. सामन्यानंतर मैदनात असो वा ड्रेसिंग रूममध्ये अनेक अशा घटना घडत असतात ज्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत असतात. असाच काहीसा प्रकार राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या सामन्यानंतर घडून आला.
त्यातील एक मैदानावर घडलेली गोष्ट तर दुसरी मात्र राजस्थान रॉयल्सच्या ड्रेसिंग रूममध्ये घडून आली. या दोन्ही घटनांच्या आकर्षणबिंदु होता तो म्हणजे द वॉल म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड. चेन्नईच्या महेंद्रसिंग धोनीने द्रविडची मैदानावर जाऊन भेट घेतली. तर ड्रेसिंग रूममध्ये राहुलसाठी नितीश राणाने ‘हिरो नंबर वन’ हे गाणे गाताना दिसून आला.
हेही वाचा : MI vs KKR : मिस्टर 360 करणार कारनामा, रोहित-विराटच्या ‘या’ खास पंक्तीत जाऊन बसणार सूर्यकुमार यादव…
रविवारी 30 मार्च रोजी गुहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामाना खेळवण्यात आला होता. या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंगचा 6 धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर धोनी आणि द्रविड यांच्या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समोर आलेल्या छायाचित्रात धोनी राहुल द्रविडला भेटताना आणि त्याच्या तब्येतीचा आढावा घेत असल्याचे दिसून येत आहे. या दरम्याने कॅप्टन कुलने द्रविडच्या पायाच्या दुखापतीबाबतची विचारपुस केली. धोनी आणि द्रविड यांच्या भेटीचा फोटो राजस्थान रॉयल्सने देखील त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वीच राहुल द्रविडच्या पायाला दुखापत झाली होती.
हेही वाचा : CSK VS RR : MS Dhoni ची विकेट अन् महिला फॅन रागाने लालबुंद, दिली लक्षात राहील अशी प्रतिक्रिया.., पाहा Video
राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना संपल्यानंतर धोनीला मैदानावर भेटल्यानंतर राहुल द्रविड ड्रेसिंग रूममध्ये गेला. तेव्हा त्याने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी करणाऱ्या फलंदाज नितीश राणाने गायलेले गाणे ऐकले. डावखुरा फलंदाज नितीश राणाने ‘महौल पुरा…’ हे गाणे गाऊन ड्रेसिंग रूममध्ये मैफिलीचा फील निर्माण केला. गण्यानंतर खेळाडूंनी शिट्ट्या आणि टाळ्यांचा वर्षाव केला. राजस्थान रॉयल्सने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर राहुल द्रविडसमोर नितीश राणा गाणं गात असल्याचा गातानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
आयपीएल 2025 तील 18 व्या हंगामात 30 मार्च रोजी गुहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने होते. या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंगचा 6 धावांनी पराभव केला. या विजयाने आरआरने आयपीएलच्या 18 व्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली तर चेन्नईला मात्र लागोपाठ दोन परभवांना सामोरे जावे लागले.