शुभमन गिल करणार भारताचे नेतृत्व (फोटो- सोशल मिडिया)
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज आणि माजी कर्णधार जो रूट याने या स्पर्धेत ६,००० हून अधिक धावांचा डोंगर उभा केला असून, अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यातील दोन कसोटी सामन्यांमध्ये शानदार खेळी करत सर्वाधिक रन्सच्या यादीत टॉप 10 मध्ये पोहोचण्याची संधी शुभमन गिलकडे असणार आहे.
IND Vs SL: ‘सर’ जाडेजा मोडणार सेहवागचा ‘हा’ रेकॉर्ड; श्रीलंकेविरुद्ध कधीपासून सुरू होणार सिरिज?
शुभमन गिल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक रन्स करणारा भारतीय फलंदाज आहे. गिलच्या नावावर या स्पर्धेत 73 इनिंगमध्ये 2843 रन्स आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सिरिजमध्ये 157 रन्स शुभमन गिलने केल्यास तर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात 3000 रन्स पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज होणार आहे. तसेच तो टॉप 10 च्या यादीत देखील समाविष्ट होणार आहे. सध्या गिल या यादीत 13 व्या स्थानावर आहे. भारतीय संघासाठी श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने जिंकणे अत्यंत आवश्यक असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारतीय संघाला जास्तीत जास्त सामने जिंकणे अत्यंत आवश्यक असणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक रन्स करणारे भारतीय
1. शुभमन गिल
2. ऋषभ पंत
3. रोहित शर्मा
4. विराट कोहली
5. रवींद्र जाडेजा
WTC मध्ये सर्वाधिक धावा करणारे प्रमुख खेळाडू
1. जो रूट – 6600 पेक्षा अधिक रन्स
2. स्टीव्ह स्मिथ – 4500 पेक्षा अधिक रन्स
३. मार्नस लॅबुशेन – 4000 पेक्षा अधिक रन्स






