सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मीडिय)
MI vs KKR : आयपीएल 2025 मध्ये वानखेडे मैदानावर आज (31 मार्च) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात महामुकाबला होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मुंबई 18 व्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद करण्यास प्रयत्नशील असणार आहे. आयपीएल 2025 मध्ये मुंबईला सलग दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आजच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तो आजच्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करणार आहे. या सामन्यात इतिहास रचत तो रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.
सूर्यकुमार यादवने आयपीएल 2025 मध्ये मुंबईसाठी गेल्या दोन सामन्यांमध्ये प्रत्येकी 29 आणि 48 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत तिसऱ्या सामन्यात त्याची नजर मोठी खेळी उभरण्यावर असणार आहे. या दरम्यान त्याला एक इतिहास रचण्याची देखील संधी साधायला मिळणार आहे.
या सामन्यात जर सूर्यकुमारने कोलकाताविरुद्ध 3 षटकार ठोकले तर तो टी-20 क्रिकेटमध्ये 350 षटकार पूर्ण करणार आहे. सूर्याने 311 टी-20 सामन्यांमध्ये आतापर्यंत 347 षटकार खेचले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ 2 भारतीय फलंदाजांनाच 350 किंवा त्याहून अधिक षटकार मारता आले आहेत. यामध्ये विराट कोहली यानी रोहित शर्मा यांचा समावेश आहे.
हेही वाचा : एमएस धोनी जखमी? 9 व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचे कारण CSK प्रशिक्षक स्टीफन यांनी केले स्पष्ट
T20 क्रिकेटमध्ये जगातील 32 खेळाडूंनी आतापर्यंत 350+ षटकार ठोकले आहेत, ज्यात भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या नावांचा समावेश आहे. रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये तब्बल 525 षटकार तर विराटने 420 षटकार लगावले आहेत. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम हा वेस्ट इंडिजच्या तडाखेबाज माजी फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलच्या नावावर 1056 षटकारांची नोंद आहे. गेल हा 1000 हून अधिक षटकार मारणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. जगातील केवळ 10 फलंदाजांनी 20 षटकांच्या क्रिकेटमध्ये 500 हून अधिक षटकार खेचले आहेत. यामध्ये रोहित शर्मा या एकमेव भारतीय फलंदाजाचा समावेश आहे.
हेही वाचा : CSK VS RR : MS Dhoni ची विकेट अन् महिला फॅन रागाने लालबुंद, दिली लक्षात राहील अशी प्रतिक्रिया.., पाहा Video
आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात मुंबई इंडियन्सला सलग दोन पराभव स्वीकारावे लागले. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आपला पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तसेच रोहित शर्मा मुंबईच्या पहिल्या सामन्यात भोपळा फोडू शकला नव्हता. तसेच तो गुजरात टायटन्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात देखील केवळ 8 धावांवर बाद झाला होता. तो सध्या खूप खराब फॉर्ममधून जाता आहे. याचा फटका मुंबई इन्डियनसला देखील सहन करावा लागत आहे.