फोटो सौजन्य - AsianCricketCouncil सोशल मिडिया
U19 Asia Cup 2025 Points Table : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये अंडर 19 आशिया कप 2025 चा सामना काल पार पडला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानच्या संघाला 90 धावांनी पराभूत केले. कालच्या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांची कमालीची कामगिरी पाहायला मिळाली. भारताच्या संघाचा आता शेवटचा लीग सामना हा मलेशियाविरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना 16 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. आशिया कप अंडर-१९ २०२५ च्या गुणतालिकेची स्थिती काय आहे यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
आशिया कप अंडर-१९ २०२५ पॉइंट्स टेबल, सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज, अव्वल फलंदाज: अंडर-१९ आशिया कप २०२५ मध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले गेले आहेत. भारतीय संघाने रविवारी पाकिस्तानचा पराभव केला . दुसऱ्या सामन्यात युएईने मलेशियाचा ७८ धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित झाला. ग्रुप ए मध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर आली.
With a dominant performance, India U19 register a huge win and qualify for the semis with a game to spare 🇮🇳#DPWorldMensU19AsiaCup2025 #INDvPAK #ACC pic.twitter.com/DXvCciPJEq — AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 14, 2025
दुसऱ्या पराभवानंतर मलेशियाही उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. गट ब मध्ये, सर्व संघांनी प्रत्येकी फक्त एक सामना खेळला आहे. श्रीलंका पहिल्या स्थानावर आहे, बांगलादेश दुसऱ्या स्थानावर आहे. पहिला सामना गमावणारा अफगाणिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे आणि नेपाळ चौथ्या स्थानावर आहे. अंडर-१९ आशिया कप २०२५ मध्ये , प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ गट टप्प्यानंतर उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
| संघ | सामना | विजय | पराभव | गुण | रन रेट |
|---|---|---|---|---|---|
| भारत | 2 | 2 | 0 | 4 | +3.240 |
| पाकिस्तान | 2 | 1 | 1 | 2 | +2.070 |
| यूएई | 2 | 1 | 1 | 2 | -1.608 |
| मलेशिया | 2 | 0 | 0 | 0 | -3.866 |
दुसऱ्या गटामध्ये श्रीलंका बांग्लादेश अफगाणिस्तान आणि नेपाळ या संघाचा समावेश आहेत. दुसऱ्या गटातील 4 सामने आतापर्यत खेळवण्यात आले आहेत. यामध्ये बांग्लादेशच्या संघाने आणि श्रीलंकेच्या संघाने त्याची विजयी सुरुवात या स्पर्धेमध्ये केली आहे. तर अफगाणिस्तानच्या संघाला त्याच्या पहिल्याच सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्याचबरोबर नेपाळने देखील पहिला सामना गमवावा लागला होता.
भारताच्या संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली कमालीची कामगिरी झालेल्या मागील दोन सामन्यामध्ये केली आहे. आता भारताच्या संघ सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आव्हान असणार आहे.






