विराट कोहली मौल्यवान सेलेब्रिटी (फोटो- ians)
विराट कोहली बनला देशातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी
चेस मास्टरने शाहरुख खान अन् धोनीला टाकले मागे
विराट नेतृत्वात आरसीबीने नुकटीची जिंकली ट्रॉफी
Rich Virat Kohli: विराट कोहली क्रिकेट विश्वातील आताच्या घाडीच सर्वात मोठा भारतीय क्रिकेटपटू आहे. विराट कोहलीच्या नावावर अनेक मोठे रेकॉर्डस आहेत. विराट कोहलीला चेस मास्टर म्हणून ओळखले जाते. आता विराट कोहलीने एका नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या बॅटने अनेक विक्रम मोडीत काढणारा ‘किंग’ विराट कोहली आता मैदानाबाहेरही जाहिरात आणि बिझनेसच्या दुनियेत राजा बनला आहे. ‘फॉर्च्यून इंडिया’ आणि जागतिक ब्रँड कन्सल्टन्सी ‘इंटरब्रँड’ यांनी देशातील २५ सर्वात मौल्यवान सेलिब्रिटीजची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामध्ये विराट कोहली हा सर्वात महागडा सेलिब्रिटी ठरला आहे.
विराट कोहली 3542 कोटी रुपयांच्या प्रचंड ब्रॅंड व्हॅल्यूसह सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी ठरला आहे. या शर्यतीत विराट कोहलीने बॉलीवूड बादशाह शाहरुख खान आणि क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. या यादीमध्ये प्रामुख्याने मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील लोकांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. यामध्ये 3 क्रिकेटपटू आणि 7 मनोरंजन क्षेत्रातील स्टार्सचा समावेश आहे.
Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट
जागतिक पातळीवर भारताची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. ती देशातील सर्वात मौल्यवान महिला सेलिब्रिटी ठरली आहे. माजी कर्णधार एमएस धोनी चौथ्या तर सचिन तेंडुलकर आठव्या स्थानावर आहे. यादीत अनुक्रमे अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, आलिया भट्ट आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन यांनी टॉप 10 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
Virat Kohli: ‘गेल्या वर्षी स्वतःला एक प्रश्न विचारला होता…’; RCB च्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली भावूक, शेअर केली पोस्ट
आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट
विराट कोहलीने शानदार खेळी करत आरसीबीला फायनलमध्ये जिंकवून दिले. त्याने 75 रन्सची नाबाद खेळी केली होती. आरसीबीच्या दुसऱ्या विजेतेपदावर विराट कोहलीने एक पोस्ट शेयर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये त्याच्या आणि संघाचा प्रवास कसा होता हे सांगितले आहे. ‘हंगामाची सुरुवात विश्वासाने केली. हा विश्वास सलग दोन ट्रॉफी जिंकून पूर्ण केला. या संघाने प्रत्येक क्षण एकत्र साजरा केला आहे. हे खास आहे कारण हे माझे घर आहे. ‘ विराट कोहील १९ वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा भाग आहे. आपल्या पहिल्या IPL ट्रॉफीसाठी अनेक वर्षांपासून वाट पाहणारा आरसीबीचा दिग्गज खेळाडू विराट कोहली, सलग दुसऱ्या विजयानंतर भावूक झाला.






