वैभव सूर्यवंशी टीम इंडिया ए कडून खेळणार (फोटो- सोशल मीडिया)
उद्या इंडिया ए विरुद्ध श्रीलंका ए सामना सुरू होणार
वैभव सूर्यवंशी भारतीय संघाकडून खेळताना दिसणार
सकाळी 10 वाजता सुरू होणार पाहिला सामना
India ‘A’ Vs Sri Lanka ‘A’: उद्यापासून क्रिकेट चाहत्यांसाठी एक नवीन पर्वणी सुरू होणार आहे. उद्यापासून भारत , श्रीलंका आणि अफगणिस्तान यांच्यात ट्राय सिरिज सुरू होणार आहे. यंदाची ही मालिका श्रीलंकेत खेळवली जाणार आहे. उद्या या मालिकेतील सलामीचा सामना इंडिया ए विरुद्ध श्रीलंका ए यांच्यात होणार आहे. उद्या वैभव सूर्यवंशी देखील खेळताना दिसणार आहे.
भारत अ संघाचे नेतृत्व तिलक वर्माकडे सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची देखील निवड करण्यात आली आहे. उद्या तो श्रीलंकेविरुद्ध खेळताना दिसणार आहे. सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे असणार आहेत. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात वैभव सूर्यवंशीची निवड करण्यात आली आहे. त्याआधी वैभव ट्राय सिरिजमध्ये खेळताना दिसणार आहे.
आयपीएल 2026 च्या हंगामात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. वेगवान शतक, संयमी खेळी, सर्वाधिक सिक्सर, सर्वाधिक रन्स असे अनेक रेकॉर्डस त्याने आपल्या नावावर केले आहेत. त्यामुळे त्याला या सिरिजमध्ये खेळताना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक असणार आहेत.
‘मी आता दूध पीत नाही तर…’; सिक्सर किंग Vaibhav Sooryavanshi चे ‘पॉवर हिटिंग’ वर भन्नाट उत्तर
सामना किती वाजता सुरू होणार?
ट्राय सिरिजमधील सर्व सामने हे 50 ओव्हर्सचे असणार आहेत. हे सामने सकाळी सुरू होणार आहेत. उद्या पहिला सामना होणार असून 8.30 वाजता टॉस होणार आहे. तर 9 वाजता सामना सुरू होईल.
लाईव्ह सामना कुठे पाहता येणार?
ट्राय सिरिजमधील सर्व सामने तुम्ही भारतात या मालिकेचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स चॅनलवर होण्याची शक्यता आहे. तसेच हे सामने जिओ हॉटस्टारवर दिसण्याची शक्यता आहे.
भारत ‘अ’ संभाव्य संघ: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, तिलक वर्मा , नेहल वढेरा, आयुष बदोनी, रियान पराग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रमणदीप सिंग, मानव सुथार, राहुल चहर , सुयश शर्मा, हर्षित राणा, वैभव अरोरा, यश दयाल.
पुढचा ‘विराट’ की ‘तेंडुलकर’? 15 वर्षांच्या Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ; पहा ‘हे’ भीमकाय रेकॉर्ड्स
आयपीएलचा अंतिम सामना झाल्यावर बीसीसीआयचे सचिव यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. ‘वैभव सूर्यवंशीमध्ये शानदार प्रतिभा आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल असणार आहे. वैभव सर्व प्रकारचे क्रिकेट खेळू शकेल यासाठी बीसीसीआय पूर्ण प्रयत्न करेल.’ यानंतर वैभव सूर्यवंशी लवकरच टीम इंडियात खेळण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.






