8000mAh बॅटरीसह Realme च्या नव्या स्मार्टफोनची भारतात एंट्री! किंमत फक्त 18,999 रुपये, 'या' दिवशी सुरु होणार सेल
कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन 3 रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये 4GB+ 128GB, 6GB+ 128GB आणि 8GB + 128GB यांचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या 4GB+ 128GB या बेस व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये आहे. तर 6GB+ 128GB व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या खरेदीवर कंपनी 2 हजार रुपयांपर्यंक इंस्टंट बँक डिस्काऊंट ऑफर करत आहे, तसेच 3 महिन्यांच्या ‘नो-कॉस्ट ईएमआय’चा लाभही मिळेल. (फोटो सौजन्य – X)
रिअलमीच्या या स्वस्त स्मार्टफोनची पहिली विक्री 17 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या वेबसाईटवर होणार आहे. ऑफरनंतर, 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये, 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये होणार आहे.
From the Segment’s Biggest 8000mAh Battery to blazing-fast 45W Charging, realme P4R 5G is built to go the distance.
Starting from ₹16,999*.
Sale starts 17th June, 12 PM.
*T&Cs apply pic.twitter.com/xE0eeWiYL2 — realme (@realmeIndia) June 10, 2026
रियलमीने लाँच केलेल्या नव्या स्वस्त स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच डिस्प्ले दिला आहे. फोनचा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट आणि 1200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन टाइटेनियम ग्लेयर, सिल्वर ग्लेयर आणि लॅवेंडर ग्लेयर या तीन कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे.
कंपनीने लाँच केलेला नवा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेटने सुसज्ज आहे. यामध्ये 8GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळणार आहे. फोनचे स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवले जाऊ शकते. यामध्ये एमआयएल-एसटीडी-810 एच मिलिट्री ग्रेड ड्यूरेबिलिटी वाली बॉडी आणि IP65 रेटिंग मिळणार आहे.
Realme P4R मध्ये 8,000mAh बॅटरी दिली आहे, जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. डिव्हाईस अँड्रॉईड 16 वर आधारीत रिअलमी यूआयवर काम करते. या फोनमध्ये ‘व्हेपर चेंबर’ कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे, जी गेमिंगदरम्यान फोनला गरम होण्यापासून रोखते.
स्मार्टफोनच्या मागील बाजूला डुअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये मुख्य कॅमेरा 50MP चा आहे. यासोबतच आणखी एक कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 8MP चा कॅमेरा दिला आहे. फोनचा कॅमेरा AI फीचर्सने सुसज्ज आहे.






