आकर्षक डिझाईनसह नव्या स्मार्टफोनने केली एंट्री... 5100mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्स करणार कमाल! जाणून घ्या किंमत
भारतातील Telegram बंदीनंतर सिईओ Pavel Durov यांनी सोडलं मौन; म्हणाले, पेपरलीक थांबणार….
कंपनीने जपानमध्ये त्यांचा नवीन स्मार्टफोन 12GB + 512GB या सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत JPY 1,63,899 म्हणजेच सुमारे 96,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन आइवरी, नेवी आणि टेराकोटा कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X)
कंपनीचा नवा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित आहे आणि कंपनीने पुष्टी केली आहे की, या फोनला तीन ओएस अपग्रेड आणि पाच वर्षांचे सिक्योरिटी अपडेट मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच फुल एचडी+ (1,080×2,340 पिक्सेल) प्रो इग्झो ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1Hz ते 240Hz पर्यंत अडॅप्टिव रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा पॅनल 3,600 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करतो.
चांगल्या परफॉर्मंससाठी यामध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 4 चिपसेट देण्यात आला आहे, ज्याला 12GB एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 512GB यूएफएस 4.1 इंटरनल स्टोरेजसह जोडण्यात आले आहे.
फोटोग्राफीसाठी Sharp Aquos R11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्याचा प्रायमरी सेंसर f/1.9 अपर्चर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) सपोर्टसह 50.3 मेगापिक्सेलचा आहे. सेटअपमध्ये 50.3 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि ओआयएस सपोर्टवाला 38.5 मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा देखील देण्यात आला आहे. कॅमेरा सिस्टिममध्ये 14-चॅनलवाला स्पेक्ट्रल सेंसर देखील देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 50.3 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये वाय-फाय 7, एनएफसी आणि ब्लूटूथ 6.0 सारखे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. पाण्यापासून सुरक्षेसाठी या डिव्हाईसला IPX5, IPX8 आणि IPX9 रेटिंग मिळाली आहेआणि धूळीपासून सुरक्षेसाठी IP6X रेटिंग दिली आहे. हा फोन एमआयएल-एसटीडी-810जी आणि एमआयएल-एसटीडी-810एच या मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणाच्या मानकांची पूर्तता करतो. सुरक्षेसाठी या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये फेसियल रिकग्निशन आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.
Sharp Aquos R11 मध्ये 5,100mAh बॅटरी दिली आहे, जी 36W चार्जिंगला सपोर्ट करते.






