स्मार्टफोनमध्ये होणार मोठा बदल! आता Lithium-ion नाही तर 'या'ची मिळणार बॅटरी, कधी विचारही केला नसेल...
2025 हे वर्ष स्मार्टफोनमध्ये मोठी क्रांती घडवणार आहे. यावर्षी स्मार्टफोनमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. यातील पहिला बदल आता झाला आहे. 2025 मध्ये स्मार्टफोनच्या बॅटरीच्या बाबतीत फार मोठा बदल झाला आहे. आता स्मार्टफोनच्या पारंपारिक लिथियम-आयन बॅटरीचा काळ संपणार आहे. आता लिथियम-आयन बॅटरीची जागा नवीन सिलिकॉन-कार्बन (SiC) बॅटरी घेणार आहेत. अनेक स्मार्टफोन युजर्सनी मागणी केली होती की, स्मार्टफोनमध्ये पारंपारिक लिथियम-आयन बॅटरी ऐवजी नवीन सिलिकॉन-कार्बन (SiC) बॅटरीचा वापर करण्यात यावा. आता अखेर त्यांची ही मागणी पूर्ण होणार आहे.
तुमच्या iPhone मध्ये आधीच TikTok इंस्टॉल आहे? थांबा डिलीट करू नका, मिळवा लाखो रुपये कमवण्याची संधी
नवीन सिलिकॉन-कार्बन बॅटऱ्यांची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा आकार फार मोठ्या नसून त्या अधिक शक्तिशाली आहेत. हे सामान्य बॅटरीपेक्षा 12.8% अधिक क्षमता देते. नवीन सिलिकॉन-कार्बन बॅटरी युजर्ससाठी फायद्याची ठरणार आहे. अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांच्या फोनमध्ये नवीन सिलिकॉन-कार्बन बॅटरी देण्यास सुरुवात देखील केली आहे. चला तर मग सिलिकॉन-कार्बन बॅटरीसह उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
POCO ने बजेट फ्रेंडली स्मार्टफोन विभागात आपला ठसा उमटवला आहे. POCO X7 Pro स्मार्टफोनमध्ये यूजरला 6000mAh ची बॅटरी मिळत आहे. ही बॅटरी 90W चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची किंमत 29,999 रुपये आहे. या डिव्हाईसचा डिस्प्ले आणि बॅटरी उत्कृष्ट आहे. तुम्ही बजेट फ्रेंडली रेंजमध्ये गेमिंग स्मार्टफोन शोधत असाल तर POCO X7 Pro तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे.
गेमिंग प्रेमींचा आवडता ब्रँड iQOO चा देखील या यादीत समावेश आहे. कंपनीने IQoo 13 मध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय हा डिवाइस स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरने सुसज्ज आहे. या डिवाइसची किंमत 54,999 रुपये आहे. तसेच, त्याचे वजन 213 ग्रॅम आहे.
OnePlus ने आपल्या 13 सिरीजमध्ये SiC बॅटरी वापरली आहे. कंपनीने OnePlus 13 मध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते, असा कंपनीचा दावा आहे. यासोबतच हा स्मार्टफोन Snapdragon 8 Elite आणि Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह येतो. OnePlus 13 ची किंमत 69,999 रुपये आणि OnePlus 13R ची किंमत 42,999 रुपये आहे.
JioMart ची खास ऑफर, iPhone 16 खरेदी करण्याची उत्तम संधी! आतापर्यंतचा सर्वात मोठं डिस्काऊंट
Vivo ने डिसेंबर 2024 मध्ये आपली X200 सीरीज लाँच केली आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 5800mAh बॅटरी दिली आहे. तर, कंपनीने Vivo X200 Pro मध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. हे फोन सामान्य वापरात 1 दिवसापेक्षा जास्त बॅकअप देतात. या सिरीजची किंमत 60 हजार रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 90 हजार रुपयांपर्यंत जाते. या सिरीजमध्ये वापरकर्त्यांना उत्कृष्ट कॅमेरा सेटअप देखील मिळतो. तथापि, प्रो मॅक्स आणि अल्ट्रा मॉडेल्स सारख्या मोठ्या ब्रँडच्या फ्लॅगशिपमध्ये SiC बॅटरीची प्रतीक्षा आहे. यावर्षी आणखी मोठ्या बॅटरी असलेले स्मार्टफोन येण्याची अपेक्षा आहे.






