Manikrao Kokate: नाशिक घर वाटप घोटाळा प्रकरणात माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
Baramati Election 2025: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीला इंदूरसारखे शहर बनवण्याचे आश्वासन दिले. आयआयटी आणि आयआयएम सारख्या संस्था बारामतीत आणणार असल्याचे सांगत राष्ट्रवादीला विजयी करण्याचे आवाहन केले.
Manikrao Kokate: २७ वर्षांपूर्वीच्या नाशिक फ्लॅट घोटाळ्यात दोषी ठरल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला. अजित पवारांनी राजीनामा स्वीकारला असून कोकाटेंवर अटकेची तलवार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने असतील अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यावर पालकमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.
विद्यार्थ्यांसाठी बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत संस्था काढल्या आहेत. यात संशोधन करणाऱ्यांसाठी कोणते विद्याथीं असावेत. त्यांचे विषय काय याबाबत निकष ठरवला जात आहे.
शहरातील विकासकामे करताना त्याची भविष्यकालीन उपयुक्तता लक्षात घेऊन प्रकल्पांची निवड करण्यात यावी असे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थान परिसरात भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेषात आंदोलनस्थळी उपस्थित होते.
२०१४ च्या प्रकरणात बारामती सत्र न्यायालयाने उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा दिलासा दिला आहे. अपुरे ऑडिओ-व्हिडिओ पुरावे असतानाही फौजदारी कारवाईचे आदेश देणे चुकीचे ठरवत सत्र न्यायालयाने महानगर दंडाधिकारी न्यायालयाचे आदेश
Sharad Pawar Birthday: बारामती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य ते 4 वेळा मुख्यमंत्रीपद... शरद पवार यांचा राजकीय प्रवास अतिशय चकित करणारा आहे. राजकारणील किंगमेकरचा राजकीय प्रवास जाणून घेऊया.
पुरवणी मागण्यांमध्ये अवाढव्य वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत देणे होय. नैसर्गिक आपत्तीच्या काळात अनेक संकटे आली.
Sharad Pawar Birthday : शरद पवारांच्या घरी झालेल्या या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे देखील आल्याचे दिसून आले.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा स्मरणात ठेवून त्यादृष्टीने वाटचाल केली, एक संघर्ष योद्धा म्हणून त्यांना भारतासह महाराष्ट्राने अनुभवले आहे.
आम्ही महायुती करण्यास प्राधान्य देऊ, मात्र चर्चेअंती युती न झाल्यास आम्ही ताकदीने निवडणूक लाढण्यासाठी तयारी केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे कार्ययाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांनी दिली.
आमच्या पक्षातून काही लोक तिकडे गेले असतानाही त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही, प्रत्येकाला आपापाला पक्ष वाढण्याचा अधिकार आहे. दादांनी महायुतीत रुसण्याचा फुगण्याचा कार्यक्रम केला नाही.
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या (अजित पवार ) पुणे पुर्व शहर विभागाची जम्बाे कार्यकारणी जाहीर झाली आहे. यामध्ये ३९ उपाध्यक्ष, २२ सरचिटणीस, १७ शहर चिटणीस, २० संघटक सचिवांसह इतर पदांचा समावेश आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुणे जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांवर कारवाई करण्याची मागणी केली.