मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासंदर्भातील रोडमॅप असलेला अत्यंत चांगला अहवाल पुण्यात प्रकाशित केल्याबद्दल नीती आयोगाला धन्यवाद देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुण्यात या क्षेत्रातील उन्नत तंत्रज्ञान पाहायला मिळते.
प्राध्यापक पदभरती १००% आणि सीएचबी मानधनवाढ याबद्दल शासन पात्रताधारकांची फसवणूक करित असून, २ वर्षापासून प्राध्यापक पदभरतीची घोषणा करतायत परंतू प्रत्यक्षात कृती ० आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी २०२५-२६ या शैक्षणिक सत्रापासून करण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने यंदा इयत्ता पाचवी व आठवीची अखेरची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे जाहीर केले.
कांदा, सोयाबीन यासह वेचणीवर आलेला कापूस, मका, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकण आणि पुणे जिल्ह्यातील भातकापणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक ठिकाणी भातशेती अक्षरशः पाण्याखाली गेली…
एका व्यावसायिकला जवळपास ३७ लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणात प्राईड ग्रुपच्या तीन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये प्राइड ग्रुपचे निरजन शहा यांचा समावेश आहे.
मुंबईतील ६६ टक्के आणि राज्यातील ६० टक्के वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसवण्यात आली आहे. मुंबई प्रदेशात अंधेरी या क्षेत्रात आघाडीवर आहे. राज्यात पुणे आरटीओ या क्षेत्रात आघाडीवर आहे.
Onion Rate News : अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. नाशिकमधील कांद्याच्या उत्पादनावर विशेष परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याची योग्य किंमत मिळत नाही.
शनिवारवाडा ऐतिहासिक स्मारकात आहे. या ठिकाणी मनाई असताना तीन अनोळखी महिलांनी चटई अंथरूण नमाज पठण केले. शनिवारी (१८ ऑक्टोबर) दुपारी पावणेदोन ते पाच वाजण्याच्या दरम्यान ही घडली.
पुण्यातील कोंढव्यात मीरा भाईंदर मधील गांजा तस्करीतील आरोपीला पकडण्यासाठी एक टीम पुण्यात आली होती. सकाळी ताब्यात घेत असताना झटपट झाली आणि त्यात या आरोपीचा मृत्यू झाला आहे.
दिवाळी जवळ येत असल्याने मॉल, किराणा, कपडे आणि मिठाईच्या दुकाने मालाने भरलेली दिसत आहेत. विविध रंगांचे आकर्षक आकाश कंदील, पणत्या, कृत्रिम फुलांच्या माळा आणि तोरणे ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत.
हायड्रोजन बसची ट्रायल रन मेडा, पीएमपीएमएल, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली आहे. पुढील सात दिवस सात वेगवेगळ्या मार्गांवर या बसची चाचणी होणार आहे.
कौशल्य शिक्षण देशाच्या उभारणीसाठी महत्त्वाचे असून कौशल्यप्राप्त व्यक्ती निर्मितीसाठी योगदान देतो. निर्मितीच माणसाचे महत्त्वाचे लक्षण असून निर्मितीत व्यस्त व्यक्तीच समाजाला दिशा देऊ शकते, असे, राजनाथ सिंह म्हणाले.
रावसाहेब पटवर्धन विद्यालयात “प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान” मोठ्या उत्साहात राबवण्यात आले. या अभियानाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे होता.
सर्वसामान्य शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा माझा प्रवास सोपा नव्हता, तो संघर्षमय होता. शेतकरी-वारकरी कुटुंबात माझा जन्म झाला. शेतकऱ्यांवर आलेल्या आपत्तीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहिलो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
ऐतिहासिक वास्तूंचे जतन संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. राज्यातील कला परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केले.
Local Body Election: राज्य सरकारने पुणे महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेला मंजुरी दिली आहे. या रचनेनुसार, एकूण 41 प्रभाग असतील, ज्यांपैकी 40 प्रभागात चार नगरसेवक, आणि 1 प्रभागात पाच नगरसेवक निवडले…
पुण्यात प्रियकराच्या मारहाणीला कंटाळून प्रेयसीनं भावासोबत मिळून त्याचा खून केला. मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळून निर्जनस्थळी फेकला. पोलिसांनी ४८ तासांत तिघांना अटक केली.
राज्यातील विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरतीसंदर्भात अनेकदा अनियमितता आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याच्या तक्रारी येत होत्या. नविन शासन निर्णय नियम ठरवण्यात आले आहेत.
पुण्यातील येरवड्यात चार आरोपींनी घरात घुसून महिला व तिच्या मुलावर तलवारीने हल्ला केला. दोघेही गंभीर जखमी झाले असून एका आरोपीला अटक, तीन फरार. परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण.