विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटप करण्यात आले आहे. मात्र यावरुन आता दोन्ही गटांत अंतर्गत वाद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सचिन सावंत म्हणाले की, जागावाटपात काँग्रेसला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत, पण काँग्रेसला फक्त 10 जागा मिळाल्या हे अतिशय खेदजनक आहे. पुढे असंही म्हणाले की, मला दिलेली जागा अंधेरीची आहे. पश्चिमेकडे स्थानिकांचा विरोध होता. ती जागा स्थानिक उमेदवाराला द्यावी वांद्रे पूर्वेची जागा आम्हाला मिळेल अशी आशा होती पण ही जागा ठाकरे सेनेकडे गेली. आम्ही कार्यकर्ते आहोत होय, पक्ष हायकमांडला मान्य असेल तो निर्णय आम्हाला देखील मान्य आहे.