व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की शेतात नांगरणीचे काम सुरु आहे. याच वेळी जमिनीवर काही अंडे पडलेली दिसत आहे. त्या आड्यांचे रक्षण करत एक चिमणी आई उभी राहिली आहे, ट्रॅक्टरला घाबरण्याऐवजी ती धाडसाने आपल्या पिल्ल्यांचे रक्षण करत आहे. आपले छोटे पंख पसरुन ती सारखा आवज करत आहे. आपल्या पिल्ल्यांसाठी लढाई लढत आहे. तिची ही हिम्मत पाहून ट्रॅक्टर चालवणारा शेतकरीही थांबला आहे. खाली उतरुन त्याने पाहिल्यावर त्याला अंड दिसले. त्याने लगेचच नांगरणी थांबवली आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @tarimdairhayat या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी त्या चिमणी आईच्या धाडसाचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, आई ही आईच असते ती कोणाचीही असो… तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने इतरांसाठी ती अंडी असतील. पण त्या आईसाठी ती त्यांचे संपूर्ण जग आहे. तर आणखी एका स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ अनेकांना भावुक करत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






