जीवापेक्षा काम महत्त्वाचे? धावत्या बाईकवर लॅपटॉप ठेवून काम करणाऱ्या तरुणाचा VIDEO व्हायरल, पाहून नेटकरी म्हणाले... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हिडिओत तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की एक युवक धावत्या बाईकवर लॅपटॉप उघडून बसला आहे. गाडी चालवताना तो सतत स्क्रीनकडे पाहत आहे. यामुळे त्याचे लक्ष रस्ता आणि लॅपटॉपमध्ये विभागले आहे. यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच रस्त्यावरुन जाणाऱ्या इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांचा सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
#BREAKING A viral video shows a Hyderabad man working on a laptop kept on his bike’s fuel tank while riding, sparking severe road safety concerns. @HydTrafficPolice @cyberabadpolice#WorkFromBike #RoadSafety #Hyderabad pic.twitter.com/lKdEfCvxMX — jarvis ☠️ (@Vishii14) June 13, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Vishii14 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींना कामाचा प्रेशरवर चिंता व्यक्त केली आहे. कोणतीही नोकरी किंवा डेडलाइन माणसाच्या जीवापेक्षा मोठी असते का? असा प्रश्न लोक करत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पुन्हा एकदा रस्ते सुरक्षितेतेबाबत जनजागृतीची गरज अधोरेखित होत आहे. तसेच कामाच्या वाढत्या ताणाबाबतही चिंता व्यक्क केली जात आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






