मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरु? १० रुपयांच्या फ्रूटीत आढळला संशयास्पद काळा पदार्थ; व्हायरल VIDEO मुळे खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी आपण अनेकदा कॉल्डड्रिक्स, थंड पाणी वैगेरे पितो. पण याच १० रुपयांच्या माझा फ्रूटीमध्ये अत्यंत संशयास्पद पदार्थ आढळला आहे. यामुळे पॅकेज फुडच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित रेले जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही १० रुपयांची फ्रूटी मुलांच्या आवडची असते आणि यामध्ये असे काही आढळ्याने अनेक पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्हायरल होत असेलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती फ्रटीचे पॅकेट फोडताना दिसत आहे. पॅकेट पूर्णपणे एका ताटात उघडल्यानंतर त्यामध्ये काळ्या रंग तरंगताना दिसत आहे. ही वस्तू नेमकी काय आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
आपके घर के बच्चे भी अगर ये पीते है तो सावधान हो जाए 😱 ये फ्रूटी को काटा और इसके अंदर कुछ ऐसा निकला जिसे देख कर आप हैरान हो जाएंगे pic.twitter.com/WCRi1lplPh — Zeeshan waris (@Zeeshan75460423) June 7, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Zeeshan75460423 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. परंतु याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. सध्या या व्हिडिओवर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. बंद पॅकेज फूडच्या गुणवत्ता आणि सुरक्षेबाबात प्रश्न विचारले जात आहे. तसेच याची तपासणी करण्याची मागणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा विभागाकडे केली जात आहे. या व्हिडिओमुळे मुलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






