BMTC Bus Harassment Viral Video (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
BMTC Bus Harassment Viral Video: सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सध्या एका घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेने तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला जागेवरच जाब विचारत ठामपणे विरोध केल्याचे दिसत आहे. या प्रकारानंतर बसमधील इतर प्रवाशांनीही हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.(Video Viral:)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना (BMTC)बीएमटीसीच्या एका बसमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. नेहमीप्रमाणे बसमध्ये मोठी गर्दी होती. त्याच गर्दीचा फायदा घेत एका प्रवाशाने महिलेसोबत अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे. काहीक्षण परिस्थिती समजून घेतल्यानंतर संबंधित महिलेने शांत न राहता थेट त्या व्यक्तीला जाब विचारला.
महिलेने मोठ्याने आवाज उठवताच बसमधील इतर प्रवाशांचेही लक्ष त्या दिशेने गेले. सुरुवातीला संबंधित व्यक्तीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. मात्र, महिलेने ठाम भूमिका घेत त्याला विरोध केला. यानंतर बसमध्ये काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकाराची माहिती चालकाला मिळताच त्याने तातडीने बस थांबवली. चालकानेही हस्तक्षेप करत आरोपीला रोखल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर काही प्रवाशांनीही त्या व्यक्तीला पळून जाण्यापासून अडवले. संपूर्ण प्रकारामुळे बसमधील वातावरण काहीकाळ तणावपूर्ण झाले होते.
यह वीडियो ध्यान से देखिए और बताइए किसकी गलती है ? BMTC बस में यात्रा कर रही एक महिला ने अपने साथ छेड़छाड़ करने वाले शख्स की जम कर पिटाई कर दी बस ड्राइवर भी तुरंत उस व्यक्ति पर हाथ-पैर बरसा देता है, बस और ट्रेन में अक्सर ऐसे व्यक्ति होते है जो भीड़ का फायदा उठाकर छेड़खानी करते… pic.twitter.com/pqTGbWowOP — Chitra Pandit (@Chitra_speak) July 26, 2026
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे. अन्याय सहन करण्यापेक्षा योग्यवेळी आवाज उठवणे महत्त्वाचे असल्याच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. काहींनी सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त केली आहे.
Soya Chaap Viral Video: सोया चाप खाणाऱ्यांनी सावधान! हा व्हिडीओ एकदा पाहाच
दररोज लाखो महिला बस, रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करतात. गर्दीच्या वेळेत काही समाजकंटक अशा परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्रवाशांनी सतर्क राहणे, संशयास्पद प्रकार दिसल्यास तातडीने मदत करणे आणि संबंधित यंत्रणांना माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असला तरी ही घटना नेमकी कधी आणि कोणत्या मार्गावरील बसमध्ये घडली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.






